सुनिता खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त विट भट्टीतील गरीब महिलांना साड्यांचे वाटप कल्याण प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या...
सुनिता खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त विट भट्टीतील गरीब महिलांना साड्यांचे वाटप
कल्याण प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता खैरनार यांच्या वाढदिवसानिमित्त विट भट्टी वाडेघर, कल्याण पश्चिम येथे गरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाने परिसरातील महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.
या कार्यक्रमाला मनसे जिल्हा सचिव विशाल सर आणि वंदना यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनिता खैरनार यांनी या उपक्रमाचे आभार मानत सांगितले की, "समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणे हीच खरी सेवा आहे."
विशाल सर यांनी आपला वाढदिवस आधारवड अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा केला. त्यांच्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
सुनिता खैरनार यांच्या या सेवाभावी कामाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. या उपक्रमाने सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
No comments