तेरसवाडीतील नकुशी ऱ्हायकर यांचे पिशवीचे ऑपरेशन मोफत, राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश कोल्हापूर प्रतिनिधी: बाजीराव पाटील क...
तेरसवाडीतील नकुशी ऱ्हायकर यांचे पिशवीचे ऑपरेशन मोफत, राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर प्रतिनिधी: बाजीराव पाटील
करवीर तालुक्यातील तेरसवाडी येथील बांधकाम कामगार सॉ. नकुशी शिवाजी ऱ्हायकर यांचे हर्नियाचे (पिशवी) ऑपरेशन तृष्णा हॉस्पिटल, भोगावती येथे यशस्वीरित्या आणि मोफत करण्यात आले आहे. राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या (मॉ. चाफोडी शाखा, पाडळी खुर्द) प्रयत्नांमुळे हे शक्य झाले.
नकुशी ऱ्हायकर यांच्या बांधकाम कामगार म्हणून केलेल्या नोंदीमुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला. माननीय डॉ. दिलीप कांबळे साहेब यांच्या सहकार्यामुळे या उपचारांना यश मिळाले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे नकुशी यांना नवजीवन मिळाले आहे.
राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष श्री. संजय सुतार व संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य या उपक्रमात लाभले. संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत आहे.
संघटनेच्या सेवाभावी कार्यामुळे समाजातील कामगारांसाठी आधारभूत ताकद उभी राहत आहे. तेरसवाडीतील या घटनेने राष्ट्रीय बांधकाम कामगार संघटनेचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
No comments