Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

विद्यामंदिर नेर्ले शाळेचे स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश

  विद्यामंदिर नेर्ले शाळेचे स्पर्धा परीक्षेत  घवघवीत यश कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार नेर्ले -विद्यामंदिर नेर्ले तालुका शाहूवाडी, जिल्हा ...

 विद्यामंदिर नेर्ले शाळेचे स्पर्धा परीक्षेत  घवघवीत यश



कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार

नेर्ले -विद्यामंदिर नेर्ले तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध स्पर्धा परीक्षेत, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे. एका ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यापर्यंत धडक मारली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे नेर्ले गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

1)कु.श्रद्धा रवींद्र पाटील S.T.S.परीक्षेत राज्यात प्रथम तसेच M.T.S.परीक्षेत राज्यात द्वितीय

2)कु.अतुल गणपती पाटील प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यात 

20वा तसेच ऋणानुबंध परीक्षेत

केंद्रात प्रथम

3)कु.अनुष्का विशाल कांबळे

 प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात प्रथम

4)कु.देवराज दीपक पाटील

  प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात द्वितीय

5)कु.रोहित गणपती पाटील

M.T.S.परीक्षेत केंद्रात द्वितीय

6)कु.रुद्र सागर पाटील M.T.S.

   परीक्षेत केंद्रात द्वितीय

7)कु.ओंकार लक्ष्मण दिंडे

  प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात द्वितीय

 

 क्रीडा विभाग-

8)कु.गणराज सचिन लोहार

 धावणे(रनिंग)100 मी.200 मी.

   400मीटरमध्ये भेडसगाव केंद्रात प्रथम आला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक मुख्याध्यापिका संजिवनी कांबळे, श्री.रवींद्र पाटील श्री.विठ्ठल गव्हाळे, श्री.प्रमोद शेळके यांनी मार्गदर्शन केले 

होते.या शाळेच्या घवघवीत यशामुळे शाहुवाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.डाॅ.विश्वास सुतार यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

No comments