विद्या मंदिर नेर्ले शाळेचे माजी शिक्षक के. आर. पाटील यांचा नागरी सत्कार संपन्न कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार नेर्ले, तालुका शाहूवाडी, जि....
कोल्हापूर प्रतिनिधी-नारायण लोहार
नेर्ले, तालुका शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथे विद्या मंदिर नेर्ले शाळेचे माजी शिक्षक के. आर . पाटील गुरुजी यांचा माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ यांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नारायण लोहार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुभाष जामदार यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले. माजी विद्यार्थी विनायक कांबळे जीएसटी कमिशनर यांनी पाटील गुरुजींचे हस्ताक्षर, शिकवण्याची पद्धत याविषयी विचार मांडले. सुभाष जामदार यांनीही गुरुजींचे अध्यापन किती प्रभावी होते हे नमूद केले. आनंदराव जामदार यांनी घार उडते आकाशी, परंतु चित्त तिचे पिलापाशी या काव्यपंक्तीच्या अनुषंगाने गुरुजींच्या कार्यांचा आढावा घेतला.प्रा.प्रशांत कांबळे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे उदाहरण देऊन गुरुचे महत्व किती असते हे विशद केले.विद्यामंदिर नेर्ले शाळेला 2027 रोजी 100वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्याचे सर्वांना आवाहन केले.तसेच नेर्ले गावचे सेवानिवृत्त शिक्षक नारायण लोहार यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ.अस्मिता दिंडे, माजी सरपंच सौ.शोभा पाटील,आण्णा पाटील व दिलीप दिंडे,उपसरपंच जयदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तत्कालीन शिष्यवृत्तीधारक महादेव दिंडे यांनी मला कशी शिष्यवृत्ती मिळाली, गुरुजींनी कशी संस्कारक्षम पिढी घडवली याविषयी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी पाटील यांनी गुरुजींनी नेर्ले गावाशी कशी अतूटनाळ जुळवली हे विशद केले. नारायण लोहार यांनी गुरुजींच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा, शिकविण्याची पद्धत, त्यांचा नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, कष्ट करण्याची वृत्ती, विद्यार्थ्यावर संस्कार कसे केले याविषयी विवेचन केले. त्याचबरोबर गुरुजींच्या निरोप समारंभ दिवशी त्यांच्या कार्यपद्धतीवर आधारित गीत सादर केले, या गीताने सर्वस्रोत्यांना भावूक व मंत्रमुग्ध केले.
1976ते1977 या वर्षातील बॅचने त्यांना मानवंदना म्हणून मानपत्र अर्पण केले. त्याचबरोबर या बॅचच्या वतीने त्यांना पोशाख शाल, व त्यांच्या पत्नी सौ. नंदिनी पाटील यांना साडी चोळी अर्पण केली. हा सत्कार सुभाष जामदार नारायण लोहार विनायक कांबळे, विलास देसाई, सर्जेराव पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष सखाराम भणगे तसेच सौ. संगीता जामदार व सौ. कुसुम भणगे यांनी केला. यानंतर सत्कारमूर्ती आदरणीय के .आर. पाटील गुरुजी यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले की नेर्ले गावाच्या माजी विद्यार्थ्यी विद्यार्थिनी ग्रामस्थ यांनी माझा जो सत्कार केला त्याने मी भरावून गेलो. आपल्या नोकरीची सुरुवात नेर्ले गावात झाली. या गावाने आपल्यावर कसे प्रेम केले हे व्यक्त केले. 19 76 रोजी शाळेत पदार्पण केले. त्यावेळी चौथीचा वर्ग आपल्याकडे सोपवला. या चौथीच्या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेत वि मीनायक कांबळे सुभाष जामदार नारायण लोहार व बाबासो पवार या विद्यार्थ्यांना बसवून उत्तीर्ण करून दाखवले. आपण खेळ सांस्कृतिक कार्यक्रम, कला, स्पर्धा परीक्षा या उपक्रमाद्वारे शाळेचा कसा कायापालट केला हे विशद केले. विद्यार्थ्यांनीही मला चांगली साथ दिली म्हणून मी विद्यार्थी प्रिय शिक्षक बनू शकलो हे आवर्जून सांगितले. तसेच ग्रामस्थांचा मला फार मोठा पाठिंबा मिळाला याचाही त्यांनी उल्लेख केला. आपले तत्कालीन सहकारी कै. बाळासाहेब पाटील गुरुजी, लोहार गुरुजी, वाडेकर गुरुजी, घोडे गुरुजी, मुख्याध्यापक ना.पां. कांबळे गुरुजी यांनी आपल्याला कसे सहकार्य केले याविषयी आवर्जून उल्लेख केला. शेवटी नारायण लोहार यांच्यावर कविता सादर केली. तसेच 1976 ते 1984 या कालावधीतील माजी विद्यार्थी यांनी गुरुजींचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. अध्यक्ष सखाराम म्हणजे यांनी आपल्या मनोगतामध्ये आपली पत्नी कुसुम म्हणजे ही गुरुजींची विद्यार्थिनी होती. गुरुजींनी तिच्यावर चांगले संस्कार केल्यामुळे मला पती म्हणून कुठेच बोलण्यास जागा ठेवली नाही असे गुरुजींच्या बद्दल गौरव उद्गार काढले. एक अतिशय आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही नेर्ले गावात नाव कमावले हे विशद केले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी विद्यार्थिनी नंदा पाटील कुसुम भणगे उज्वला दिंडे नंदा दिंडे अक्काताई पाटील इंदू जामदार, विद्यार्थी अण्णा डांगे बाळ पाटील, महादेव दिंडे, सुभाष जामदार विनायक कांबळे नारायण लोहार विलास देसाई सर्जेराव पाटील ग्रामस्थ बी एस पाटील, शिवाजी पाटील, घनश्याम पाटील, सरपंच सौ. दिंडे वहिनी, उपसरपंच जयदीप कांबळे, दिलीप गवळी, नाटेकर साहेब व सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, इतर ग्रामस्थ, तसेच विद्यामंदिर नेर्ले शाळेच्या मुख्याध्यापिका माने यमॅडम, गव्हाळे सर व इतर शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. शेवटी सखाराम भणगे यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली
No comments