Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस निमित्त वडरगे येथे विविध शालेय स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस

 * वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  यांचा वाढदिवस निमित्त वडरगे येथे  विविध  शालेय  स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस देऊन, सर्व मुलांना अल्प...


 *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  यांचा वाढदिवस निमित्त वडरगे येथे  विविध  शालेय  स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस देऊन, सर्व मुलांना अल्पोपहार, शैक्षणिक साहित्य  देऊन        डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व जिल्हा लोककलाकार समिती, उत्तूर* यांच्या वतीने  उत्साहात संपन्न                           गडहिंग्लज  - वैद्यकीय शिक्षण मंत्री  महाराष्ट्र राज्य मा. ना. हसन मुश्रीफ सो यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने   प्राथमिक विद्या मंदिर व अंगणवाडी,  वडरगे  येथे  क्रीडा उत्सव घेऊन  मुलांना अल्पोपहार, शैक्षणिक साहित्य  व बक्षीस वितरण करताना.डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन विद्यार्थी विकास परिषद,कोल्हापूर  महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उत्तूर.  जिल्हा  लोककलाकार समिती,उतूर चे  अध्यक्ष डॉ सचिन  पोवार,  यांच्या हस्ते तर सामाजिक कार्यकर्ते  व श्री रेणुका द्रोण पत्रावळी  उद्योग  चे  भैरू चौगुले , वडरगे सरपंच  सौ. सविता पाटील, अर्धसैनिक कॅन्टीन चे प्रमुख  माजी सैनिक भाऊसो मोरे,डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन च्या संचलिका  सरिता पोटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत  व मुख्याध्यापिका गीता माळी यांच्या अध्यक्षतेखाली  कार्यक्रम पार पडला.  डॉ पोवार म्हणाले ग्रामीण भागातील सर्वसामान्याची शाळा टिकली पाहिजे, या शाळेतूनच   मोठ-मोठे  अधिकारी घडलेत  यांचा आपण  आदर्श घ्यावा. आहार, विहार, व्यायाम या त्री सूत्री चा  वापर करून आरोग्य आरोग्य  सदृढ  ठेवून  मन प्रसन्न राहते   व अभ्यासात प्रगती येते. सामाजिक कार्यकर्ते भैरव चौगुले, माजी सैनिक भासो मोरे सरपंच  पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक व  शाळा व्यस्थापन कमिटी अध्यक्ष किरण माने, महादेव मोरे,भगवान गोरुले, महादेव गायकवाड, अनिल देवार्डे,आनंद जावळे, माया होडगे, आदी महिला सह ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.                           प्रास्ताविक डॉ पोवार फौंडेशन च्या ट्रस्टी सरिता पोटे यांनी करून फौंडेशनच्या कामाचा  परिचय करून  स्पर्धा - क्रीडा उत्सवाची  माहिती सांगितली.सूत्र संचालन सुलोचना  चिदंके  यांनी तर आभार वैशाली कोष्टी यांनी मानले.

No comments