* न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न* अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील पाडळ...
*न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 2001- 2002 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात शाळेच्या प्रांगणामध्ये दिनांक 13 4 2025 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण भापकर हे होते. यावेळी विचार मंचावर शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री विनायक कचरे हे होते, तसेच कृतिशील शिक्षक अण्णासाहेब आमटे, शेख सर, गव्हाणे सर, सावंत सर, ढाकणे सर व कांबळे मामा यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकाप्रती असलेला आदरभाव व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दीली. शिक्षक हे कृतीतून शिक्षण देतात म्हणून ते दीर्घ काळस्मरणामध्ये राहतात, आठवणीचा अमूल्य ठेवा जपून ठेवत आयुष्यभर आपण मार्गक्रमण करत राहतो. शिक्षकांच्या शिकवणुकीमुळे व संस्कारामुळे आज कित्येक जण उच्चपदस्थ झाले आहेत . मागील 25 वर्षानंतरही आजही गुरुजनाविषयी मनामध्ये आदर युक्त भीती असल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता मधून मान्य केले.
यावेळी शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रथमतः गव्हाणे सर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक जीवनशैलीच्या अनेक आदर्श टिप्स दिल्या व विद्यार्थ्यांनी मिळवलेला नावलौकिक हाच शिक्षकाचा बॅलन्स असतो असं म्हणत विद्यार्थ्यांच्या प्रगतीला शाबासकीची थाप दिली ,तर चितळे सर यांनी मनशांतीसाठी आपण अध्यात्मिक मार्गाकडे वळण्याचा सल्ला दिला. शिक्षण घेत असताना मुलांना आम्ही शिक्षा दिली असली तरी ती काळाची गरज होती त्याला पर्याय नव्हता, संस्कारक्षम मुल तयार होण्याकरता वेळप्रसंगी कटूता स्वीकारली लागते, त्याशिवाय आयुष्यात समाधान नाही व आनंदचे मूळ समाधान आहे असे म विचार मांडत अण्णासाहेब आमटे सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विनायक कचरे सर यांनी मुलांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या व काही जुन्या आठवणींना उजाळा ही दिला. शिक्षण घेत असताना झालेल्या गमती जमती आणि विनोद सांगायला ही सर् विसरले नाही. आणि शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण भापकर सर यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले चितळी , पाडळी, ढवळेवाडी, ही गाव शैक्षणिक दृष्ट्या अतिशय जागृत आहेत .आपल्या आयुष्यामध्ये काय मिळवले यापेक्षा मानसिक समाधान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण कितीही संपत्ती कमावली तरी बरोबर काही येत नाही परंतु परमार्थातले कोणतेच कार्य वायाला जात नाही. कवी विंदा करंदीकर यांच्या ओळीची आठवण करून देत दातृत्व शक्तीचा आणि परोपकाराचा धर्म हाच मानवता धर्म आहे आणि तो आपण अंगीकारला पाहिजे अ से सद विचार व्यक्त करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भविष्या करता शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ बेबी कचरे यांनी प्रयत्न केले. यावेळी आत्माराम कचरे, डॉक्टर नितीन ढमाळ, स्वप्निल कांबळे, आदिनाथ भोर्डे, पुष्पा चितळे, सखाराम कुलकर्णी, सुनिता कांबळे ,पवन थोरात ,स्वाती चितळे राहुल कांबळे, आशाबाई कचरे , सचिन पठारे ,प्रशांत गांधी ,मंदा आघाव, ज्ञानेश्वर कचरे ,संगीता कचरे, अमोल कचरे, अंबादास कचरे ,सरला केदार, भारती कोठुळे ,संतोष कोठुळे ,अमोल कचरे, रवी चितळे यशोदास कांबळे, संदीप गरजे ,प्रवीण गरजे संदीप कचरे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाडळी गावचे युवक कार्यकर्ते आदिनाथ तांदळे यांनी केले ,तर बेबी कचरे यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments