Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

गुरुवारी 17 एप्रिलला श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा

  गुरुवारी 17 एप्रिलला श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा आधुनिक ऊस शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबद्द...

 गुरुवारी 17 एप्रिलला श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा


आधुनिक ऊस शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबद्दल शेतीतज्ञ व प्रमुख शास्त्रज्ञांचे होणार मार्गदर्शन


शिरोळ/ प्रतिनिधी:

 श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महाधन ॲग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा व गळीत हंगाम 2024- 25 ऊस पिक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे. यावेळी 100 टना पेक्षा जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी आधुनिक ऊस शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराबद्दल शेतीतज्ञ व प्रमुख शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. 

      व्ही.एस.आय. पुण्याचे महासंचालक संभाजी कडूपाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.  व्ही.एस.आय.चे प्रमुख शास्त्रज्ञ आणि पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. कडलग यांचे 'पूर्व मशागतीचे महत्त्व' या विषयावर, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप यांचे 'सेंद्रिय कर्ब व त्याचे महत्त्व' या विषयावर, राहुरी महात्मा कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांचे 'सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान' या विषयावर, मृदाशास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेषज्ञ विवेक भोईटे यांचे 'शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (ए. आय. तंत्रज्ञान' याविषयी आणि महाधन ॲग्रोटेक लिमिटेड पुण्याचे सीनियर जनरल मॅनेजर बिपीन चोरगे यांचे 'ऊस पिकातील रासायनिक खतांचा वापर' या विषयावर सखोल व्याख्यान होणार आहे.

 यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक गणपतराव पाटील, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, सर्व संचालक मंडळ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून 100 टना पेक्षा जास्त ऊस उत्पादन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमधील वापर याविषयीच्या तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी केले आहे.

No comments