*सातवे (ता. पन्हाळा) येथील माहेरवाशिणी सौ. राणी कुंभार यांचा स्तुत्य निर्णय —* *_संत विचारांचा स्वीकार करत 'बकरं कापायची जत्रा' बंद...
*सातवे (ता. पन्हाळा) येथील माहेरवाशिणी सौ. राणी कुंभार यांचा स्तुत्य निर्णय —* *_संत विचारांचा स्वीकार करत 'बकरं कापायची जत्रा' बंद करून दिला सामाजिक सलोख्याचा संदेश_*
सातवे (ता. पन्हाळा) गावातील बी. जे. कुंभार यांची कन्या व श्री. सदाशिव कुंभार यांची पुतणी असलेल्या सौ. राणी रजनीकांत कुंभार (सध्या राहणार ठाणे, मुंबई) यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि समाजप्रेरक निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या गावातील आळोबानाथ मंदिरातील पारंपरिक 'बकरं कापायची जत्रा' बंद करून, त्या जागी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला आणि संत विचारांचा खरा आदर्श समाजासमोर ठेवला.
लहानपणापासून कीर्तन, प्रवचन व संतांच्या विचारांची प्रेरणा घेत आलेल्या राणी कुंभार यांना ही जुनी प्रथा योग्य वाटली नाही. “देव कधीच दुसऱ्या जीवाच्या बलिदानावर प्रसन्न होत नाही. देवासाठी सर्व जीव समान आहेत,” असा ठाम विचार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निर्णयाला केवळ कुटुंबीयांचाच नव्हे तर गावकऱ्यांचाही भरभरून पाठिंबा मिळाला.
या वेळी त्यांच्यासोबत तळसंदे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी महेश कुंभार या देखील उपस्थित होत्या. राणी कुंभार यांनी केवळ धार्मिक दृष्टीकोनातून नव्हे तर सामाजिक जबाबदारी समजून आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या विधायक कार्यासाठी आर्थिक मदत देखील केली.
या कुंभार कुटुंबाचा निर्णय समाजाला नवा विचार देणारा ठरतो आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विवेकी विचारसरणीचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला असून, भविष्यातील पिढ्यांना अहिंसा, करुणा आणि संत विचारांच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली आहे.
यावेळी तळसंदे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी महेश कुंभार .राणी कुंभार.रजनीकांत कुंभार . डॉ. संतोष निकम. सतीश डुबल गुरुजी. सदाशिव कुंभार उपस्थित होते..
No comments