Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रिरोग व बालरोग तपासणी शिबीर.

  जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रिरोग व बालरोग  तपासणी शिबीर.            🔹 शिबीरात  होणार   विविध आजारांवर तपासणी.    🔹 यश मेडिकल स्टोअर्सच...

 जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रिरोग व बालरोग  तपासणी शिबीर.        



  🔹 शिबीरात  होणार   विविध आजारांवर तपासणी.

   🔹यश मेडिकल स्टोअर्सचा  महत्वपूर्ण उपक्रम..     

              गडचिरोली (चक्रधर मेश्राम)दिनांक:- ७/३/२०२५.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यश मेडिकल स्टोअर्सच्या  स्तुत्य आणि जनहितार्थ आरोग्य उपक्रमातून स्त्री रोग व बालरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे .  या आरोग्य तपासणी शिबीरात  गरोदर मातांची तपासणी, महिलांची प्रसूती पुर्व आणि पश्चात तपासणी,  गर्भाशयाचे आजार ,  मासिक पाळीतील समस्या ,  मधुमेह,  रक्तदाब, वंध्यत्व निवारण,  बालदमा, निदान आणि उपचार,  मेंदुज्वर , ताप यांसारख्या विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.या आरोग्य तपासणी शिबीरात उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथील बालरोग तज्ञ डॉ.श्रीकांत कावळे ,  सायन रुग्णालय मुंबईचे स्त्री रोग तज्ञ डॉ राकेश दडमल  हे महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत.  तरी ८ मार्च रोजी गडचिरोली जिल्ह्यातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या संधीचा लाभ घ्यावा  .असे आवाहन यश मेडिकल स्टोअर्सचे  संचालक  बन्सोड यांनी केले आहे.

No comments