Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

लोकमित्र व विदयार्थी मित्र, आरोग्य दूत एक बहुआयमी व्यक्तिमत्व.. डॉ. एस.जी. पोवार

 * लोकमित्र व विदयार्थी मित्र,  आरोग्य दूत  एक बहुआयमी  व्यक्तिमत्व* ..  डॉ. एस.जी. पोवार          उतूर -  डॉ.पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंड...

 *लोकमित्र व विदयार्थी मित्र,  आरोग्य दूत  एक बहुआयमी  व्यक्तिमत्व* ..  डॉ. एस.जी. पोवार      



   उतूर -  डॉ.पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशनचे  *संस्थापक* व विद्यार्थी विकास परिषद,कोल्हापूर  महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उत्तूर चे *मुख्य कार्यकारी अधिकारी  (C.E.O.)*  डॉ सचिन  गोविंदराव पोवार यांच्या कार्याचा आलेख  गेली 25 वर्षे  उंचावत  आहे. त्यानी ग्रामीण भागातील   सर्व सामान्याच्या मूलभूत गरजासह, विध्यार्थ्यांच्या अडचणी सह युवा तरुण वर्ग - आभाल - वर्धाचे त्याचे विविध जिव्हाळ्याचे प्रश्न  सातत्य पुवर्क पाठ पुरावा करून सोडविण्यासाठी प्रयत्नशील  कर्तृत्व तसेच  ग्रामीण भागातील  जिल्हा परिषद  शाळा टीकाव्यात यां उदांत हेतून  630 च्या वर वाडया वसत्या वरील मुलांना आयडेंटी कार्ड सह शैक्षणिक साहित्य वाटप  करून विध्यार्थ्यां विषयाची  त्याची  धडपड  दिसून येते.. त्याबरोबर च  त्यांनी हळदी तालुका कागल येथील  निवासी आश्रम शाळेस  भेट  देऊन तेथील  मुलां सोबत  आपला वाढदिवस  साजरा करून त्या मुलांना खाऊंचे - जेवणाचे व शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.ग्रामीण  भागातील  नागरिकांना मोफत आरोग्य व नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे  मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे.. त्याचबरोबर लोप पावत चाललेल्या लोककला  जपाण्यासाठी  गेली,20 वर्षे उतूर आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड,  कापशी कागल सह वारणा - कोडोली सह पन्हाळा  तालुक्यात कलाकारांसाठी लोककला महोस्तवाचे  आयोजन करून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम  व कलाकारांना मानधन  मिळावे म्हूणन शासन दरबारी पाठपुरावा  करून 3000/- च्या वरती मानधन  मिळून दिले.  त्याबरोबरच कोल्हापूर ला तीर्थ क्षेत्र दर्जा मिळावा यासाठी ( 100000/- ) *एक लाख  सह्याची यशस्वी मोफिम* राबवून कोल्हापूर तीर्थक्षेत्र विकासाला चालना  मिळवण्याचे काम डॉ सचिन  पोवार यांनी त्याच्या डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषद,कोल्हापूर  महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उत्तूर यांच्या वतीने विविध काम निस्वार्थी पण केली आहेत.  महाराष्टातील कोल्हापूर -  उतूर -चंदगड आंबोली  ते  कर्नाटकातिल निपाणी - सह बेळगांव गोवा रेल्वे  मार्गासाठी 1995 पासून पाठपुरावा  सुरु असून आता 2 लाख  पत्रे केंद्रा सह राज्याना पाठवण्याचे पवित्र काम हती घेतले  आहें. यां बहुआयमी   व्यक्तिमत्वची  कार्याची दखल  घेऊन  डॉ सचिन  गोविंदराव पोवार यांना व त्याच्या संस्था -  डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन  व विद्यार्थी विकास परिषद,कोल्हापूर  महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उत्तूर  यांना राज्यातर्गत व पर राज्यातून विविध  पुरस्काराने सन्मानीत  करण्यात आले आहे...

No comments