Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

अल्पवयीन मुलीवर विनयभंग

  अल्पवयीन मुलीवर विनयभंग         १२ वर्षीय मुलीवरील विनयभंग प्रकरणी कठोर कारवाई करावी. : सकल हिंदू समाज         गगनबावडा प्रतिनिधी :संभाजी ...

 अल्पवयीन मुलीवर विनयभंग

        १२ वर्षीय मुलीवरील विनयभंग प्रकरणी कठोर कारवाई करावी. : सकल हिंदू समाज



        गगनबावडा प्रतिनिधी :संभाजी सुतार


        साळवण पोलीस स्टेशन अंतर्गत निवडे तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक १६ मार्च २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता अल्लाबक्ष मुल्ला (वय ६२) याने एका १२ वर्षीय मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर गुन्ह्यासंदर्भात संबंधित इसमास १७ मार्च २०२५ रोजी ३ः ३५ मि. अटक करण्यात आलेली असून सध्या त्याला कळंबा मध्यवर्ती करागृह येथे असुन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी सकल हिंदू समाजाची ठाम मागणी आहे. या गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड अथवा मिटवामिटवी न होता गुन्हेगारावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनातून केली . बालकांच्या सुरक्षेसाठी व समाजात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याचा कठोर बडगा उचलणे अत्यंत गरजेचे आहे.

        सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाने निष्पक्षपणे तपास करून संबंधित आरोपीस कायद्याच्या कचाट्यात ठेवावे आणि त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व आवश्यक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. सकल हिंदू समाज कोल्हापूर यांच्या वतीने गगनबावडा पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले यावेळी  तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते . या घटनेचा पुढील तपास गगनबावडा पोलिस निरिक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

No comments