*'व्यवस्थेचा मीच बळी' या कवितेने केले शिक्षण व्यवस्थेच्या विदारकतेवर प्रहार!*-बिबीशन चाटे (ज्येष्ठ पत्रकार)- वर्धा येथील प्रा.डॉ.म...
*'व्यवस्थेचा मीच बळी' या कवितेने केले शिक्षण व्यवस्थेच्या विदारकतेवर प्रहार!*-बिबीशन चाटे (ज्येष्ठ पत्रकार)-
वर्धा येथील प्रा.डॉ.मनीषा रिठे यांची काव्यरचना स्व.धनंजय नागरगोजेंना समर्पित..
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-
बीड जिल्ह्यातील शिक्षक स्व. धनंजय नागरगोजे यांनी तब्बल सोळा वर्ष पगाराविना काम केल्यानंतर संस्था आणि शिक्षण व्यवस्थेच्या अत्यंत भयान स्थितीला कंटाळून अखेर स्वतःला संपवले. याची धग महाराष्ट्रभर पोहोचली. आणि संवेदनशील मनाच्या अनेक शिक्षण प्रेमींनी आपल्या वेदना व्यक्त केल्या. यात वर्धा येथील कवयित्री आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मनीषा रिठे यांची स्व. धनंजय नागरगोजेंना समर्पित केलेली काव्यरचना शिक्षण क्षेत्रासह सर्वांनाच अंतर्मुख करायला लावत आहे.
"व्यवस्थेचा मीच बळी
जळून या शोषलेला
तोंड दाबून वरती
भोगवटा भोगगेला.."
यातून कवयित्रीने शिक्षकांच्या वेदनेला व्यक्त केले आहे. अत्यंत गरिबीतून कष्टप्रद शिक्षण घेतल्यानंतर वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुलं एका आशेने पाहतात; परंतु ही व्यवस्था हे स्वप्न पुरे होऊ देत नाही.
"मोडका तोडका होता
असेने त्या जपलेला,
बघा ना साहेब जरा
संसार हा विझलेला..!"
स्व. धनंजय नागरगोजे यांनी घेतलेला गळफास... आणि अशावेळी त्या पायाला धरून ओकसा बॉक्सी रडणारा सत्तर वर्षाचा बाप... हे दृश्य महाराष्ट्रातील संवेदनशील माणसाच्या हृदयाला पिळ घालणारे आहे.
बीडच्या घटनेवर विदर्भातील वर्धा येथील प्रा. डॉ. मनीषा रिठे यांनी या शिक्षण व्यवस्थेच्या विदारक स्थितीवर केलेला प्रहार विविध माध्यमांच्या द्वारे व्यक्त होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या शिक्षण व्यवस्थेच्या भविष्यावर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा सुनील डिसले (बारामती), प्रा संपतराव गरजे (पुणे), प्रा. बाळासाहेब माने (मुंबई), प्रा.मनिषा रिठे (वर्धा), या उच्च माध्यमिक शिक्षकांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्याची तसेच मराठी विषय उच्च माध्यमिक स्तरावर अनिवार्य करण्याची मागणी केली आहे
बीड येथील प्रा.आत्माराम झिंजुर्डे, प्रा.अशोक देवगुडे, प्रा.बिभिषण चाटे, प्रा. अमोल घुमरे, प्रा. कावेरी खुरणे, प्रा. आनंद देशमुखे, प्रा नारायण तांबे, प्रा. प्रेमदास राठोड, प्रा. बाळासाहेब नागरगोजे, प्रा उद्धव घोळवे, प्रा. खुशाल सोनवणे,प्रा. शिवाजी राठोड यांच्यासह शिक्षक बांधवांनी स्वर्गीय धनंजय नागरगोजेंच्या दु:खद स्थितीवर सवेदनशील मनाने वास्तव मांडणी केल्याबद्दल वर्धा येथील प्रा. डॉ. मनीषा रिठे यांचे कौतुक केले आहे.
No comments