Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयात शेतकरी मेळावा संपन्न

  *डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयात शेतकरी मेळावा संपन्न*.   अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-     श्री .दादापाटील राजळे शिक्ष...

 *डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालयात शेतकरी मेळावा संपन्न*.



  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-     श्री .दादापाटील राजळे शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेले व महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त डॉ . अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्र विद्यालय , आदिनाथ नगर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन मिळवणाऱ्या व गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादित करणाऱ्या तसेच कृषी आधारित स्वयंरोजगार उद्योगात स्वतःची नवी ओळख निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव शेवगाव - पाथर्डी तालुक्याच्या  आमदार मोनिकाताई राजळे व  मान्यवरांच्या शुभहस्ते  करण्यात आला .



      यावेळी श्री.बी . एम .लोंढे   (तालुका कृषी अधिकारी , पाथर्डी ), श्री.नंदकिशोर थोरे (मंडळ कृषी अधिकारी , तिसगाव ) , श्री . राहुल राजळे , (विश्वस्त , श्री .दादा पाटील राजळे शिक्षण संस्था ) , श्री .रामकिसन काकडे, ( व्हाईस चेअरमन वृ . सह . सा .का .लि .आदिनाथनगर ) , श्री .रामदास म्हस्के , (उपाध्यक्ष , शिवाजी विद्या विकास मंडळ ), श्री .विक्रमराव राजळे (सचिव , शिवाजी विद्या विकास मंडळ ) , श्री . आर .जे .महाजन, (सचिव , श्री . दादापाटील राजळे शिक्षण संस्था ) , श्री .बी. एम .गोरे . (सचिव , आदिनाथ कृषी विकास प्रतिष्ठान ), डॉ राजधर टेमकर ( प्राचार्य , दादापाटील  राजळे कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , डॉ.प्रदीप देशमुख ( प्राचार्य , लोकनेते आप्पासाहेब राजळे कॉलेज ऑफ फार्मसी ) , डॉ. संतोष पायघन , आदी प्रमुख मान्यवरांच्या  व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते . याप्रसंगी  प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी श्री .मखंळराव पांढरे तसेच शिवकुश भाजीपाला रोपवाटिकेचे संचालक  श्री.शशिकांत बोरुडे या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व  स्वागत प्राचार्य सुनील पानखडे यांनी केले . तर शेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचे व प्रमुख अतिथींचे आभार प्रा.संभाजी मरकड यांनी मानले .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .राजेंद्र इंगळे यांनी केले .

No comments