Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

प्राचार्य डॉ.राजधर टेमकर एक ज्ञानतपस्वी - डॉ. बाबुराव

प्राचार्य डॉ.राजधर टेमकर एक ज्ञानतपस्वी - डॉ. बाबुराव  उपावध्ये अहिल्यानगर (बाळासाहेब कोठुळे) प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची राज्य...

प्राचार्य डॉ.राजधर टेमकर एक ज्ञानतपस्वी - डॉ. बाबुराव


 उपावध्ये अहिल्यानगर (बाळासाहेब कोठुळे) प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची राज्यस्तरीय विभागीय प्राचार्य प्रवर्तकपदी निवड होणे ही ग्रामीण क्षेत्रातील ज्ञानतपस्वी, समर्पित व्यक्तिमत्वाचा खरा गौरव होय, असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील वाचत संस्कृती प्रतिष्ठानतर्फे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांचा डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची राज्य व तंत्रशिक्षण विभाग,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यरत करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत २०२५ ते२०३० या पाच वर्षासाठी राज्यस्तरीय विभागीय प्राचार्य प्रवर्तक म्हणून निवड होणे गौरवास्पद असून प्राचार्य डॉ. टेमकर यांच्या ज्ञानशील, सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची खरी दखल घेतली गेली आहे, हे भूषणावह असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या हस्ते झालेल्या सत्कार प्रसंगी त्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शक भास्करराव गोरे, प्रा. विलासराव तुळे, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. जालिंदर कानडे, प्रा.डॉ. मेहबुब तांबोळी, प्रा.डॉ. काकडे मॅडम, प्रा. अंजुम शेख आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. टेमकर यांनी दादा पाटील राजळे, ॲड. रावसाहेब यांच्या आठवणी सांगत करिअर कट्टा अंतर्गत उपक्रमांचे यशस्वी नियोजन करणार असल्याचे सांगितले.

No comments