Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

स्व. प्राचार्य रा.रं बोराडे यांनी ग्रामीण साहित्याला वैश्विक मूल्य दिले- डॉ. वंदनाताई मुरकुटे

 स्व. प्राचार्य रा.रं बोराडे यांनी ग्रामीण साहित्याला वैश्विक मूल्य दिले- डॉ. वंदनाताई मुरकुटे अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- साहित्...

 स्व. प्राचार्य रा.रं बोराडे यांनी ग्रामीण साहित्याला वैश्विक मूल्य दिले- डॉ. वंदनाताई मुरकुटे



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- साहित्यिक हा सर्व समाजाला दिशादर्शक ठरतो, साहित्यिकांच्या योगदानाची कृतज्ञता जपणे ही आपली उच्चतर संस्कृती आहे, पीएच.डी.च्या संशोधन काळात ज्यांचे व्यक्तिमत्त्व आणि साहित्य संस्कारशील ठरले, ते स्व. प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी ग्रामीण साहित्याला मानवतेचे वैश्विक मूल्य दिले असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समितीच्या मा. अध्यक्षा डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केले.

   श्रीरामपूर येथील इंदिरानगर भागातील पुण्यभानू वास्तू प्रांगणात माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ग्रामीण साहित्यिक स्व. प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या स्मृती सोहळ्याला उजाळा देण्यासाठी साहित्यिकांतर्फे सुमानांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शोकसभेची भूमिका स्पष्ट करताना डॉ. वंदनाताई मुरकुटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी     स्नेहग्रुप परिवाराचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री काशिनाथ गोराणे, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते प्राचार्य बोराडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार, फुले अर्पण करून मानवंदना देण्यात आली. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ' स्व. प्राचार्य रा. रं. बोराडे' ही कविता सादर करून बोराडे यांच्या साहित्य योगदानाचे सूत्र विशद केले. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी डॉ. आनंद यादव, प्राचार्य रा. रं. बोराडे, डॉ. द.ता. भोसले यांच्या कथेतील स्त्रीप्रतिमा या विषयावर डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या       मार्गदर्शनाखाली पुणे       विद्यापिठातून पीएच.डी. प्राप्त केली, त्या काळातील प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या भेटीतील आत्मीय, बौद्धिक आठवणी आणि त्यांचे अपूर्व साहित्यिक योगदान याविषयी सविस्तर विवेचन डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले. हा साहित्यिक ऋणानुबंध जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. काशिनाथ गोराणे म्हणाले, डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचा हा स्तुत्य उपक्रम असून साहित्य आणि साहित्यिक यांची दखल घेण्याचे औदार्य दाखविणे ही काळाची गरज आहे,कारण साहित्यिक लिहितात पण त्यांना अनेकांकडून त्रासही सहन करावा लागतो. प्राचार्य बोराडे यांना अशोक सहकारी कारखाना कार्यक्रमात आणल्याचे अनुभव त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, सुखदेव सुकळे यांनी प्राचार्य बोराडे यांच्या विविध उपक्रम भेटीतील अनुभव सांगितले. कवी पोपटराव पटारे, डॉ. रवींद्र कुटे, प्रा. सौ. मंजिरी सोमाणी, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, सौ. भाग्यश्री बडे, कवयित्री संगीता फासाटे, पत्रकार ॲड, बाळासाहेब तनपुरे, करण नवले,अर्जुन राऊत,प्रा. डॉ. भास्कर निफाडे, डॉ. शिवाजी काळे, प्रा.डॉ. कैलास महाले, प्रा. अविनाश मेहेत्रे, कवी आनंदा साळवे, रज्जाक शेख आदिंनी प्राचार्य बोराडे यांच्या व्यक्तित्व आणि साहित्याचा परामर्श घेतला. प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा. प्रकाश साबळे आदिसह अनेकांनी मानवंदना दिली. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या कृतज्ञता उपक्रमाचे कौतुक केले. अशी दृष्टी असणे ही


समाजमनाची श्रीमंत वाढवते. खुंटेगाव ता. औसा जि. लातूर याच  भागातील माझे कुटुंब जीवन घडल्यामुळे प्राचार्य बोराडे यांचे जीवन व साहित्य मी जवळून पाहिले आहे, त्यांचे अपूर्व योगदान    श्रीरामपुरातील साहित्यिकांनी जपले आहे, ही प्रेरणादायी मानवंदना असल्याचे सांगून आठवणी विशद करून डॉ.वंदनाताई        मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. संयोजनामध्ये शरद आव्हाड, दिलीप राऊत यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे यांनी समारोप करताना श्रीरामपूरची साहित्य चळवळ याच जाणिवेतून गतिशील व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments