Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

बालिका अत्याचार प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालविण्याची लाल सेनेने केली मागणी.

 बालिका अत्याचार प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालविण्याची लाल सेनेने केली मागणी. ...............................................  परभणी: परभणी य...

 बालिका अत्याचार प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालविण्याची लाल सेनेने केली मागणी.



............................................... 

परभणी: परभणी येथे एका नाबालिक मातंग मुलीवर अत्याचार झाला असून सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामार्फत चालण्याची मागणी आज लाल सेनेने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, लहूजी परभणी येथील एक नाबालिक चिमुरडी बालिका वय दहा वर्षे भंगार गोळा करण्याचे काम करत होती. दररोजच्या प्रमाणे बालिका भंगार वेचण्यासाठी गेली असता दिनांक: 23/02/2025 रोजी दुपारी 03.00 च्या सुमारास सदरील बालिका हाडको कॅनल परिसरात भंगार वेचत असताना त्या ठिकाणी गोतम नगर भागात राहाणारे यशोदीप कनकुटे आणि श्रवन टेकूळे आले आणि तीला म्हणाले, "चल आम्ही तुला घरी सोडतो" ती "नको" म्हणाली असतांना तीला बळजबरीने उचलून नेले आणि रात्रभर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. जखमी झालेली बालिका 24/02/2025 रोजी पहाटे रक्तबंबाळ झालेल्या आवस्थेत घरी आली आणि झालेली सर्व दुर्दैवी घटना तीने आपल्या आईला सांगितली. सदरील घटना अत्यंत क्रूर असून माणुसकीला काळी फासणारी आहे त्यामुळे आरोपींना शिक्षा देखील तात्काळ होणे गरजेचे आहे अन्यथा या घटनेचे गांभीर्य नष्ट होऊन अशा घटना करण्याची प्रवृत्ती बळावेल त्यामुळे सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि आरोपींना फासावर लटकावे अशी मागणी लाल सेनेने केली आहे निवेदनावर कॉ गणपत भिसे, कॉ. उत्तम गोरे, कॉ. अशोक उबाळे, कॉ. अविनाश मोरे, कॉ. एल. डी. कदम, कॉ. किशोर कांबळे, कॉ. विकास गोरे,  कॉ. संजय गोरे, कॉ. प्रदीप भिसे, कॉ. सिद्धांत भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments