श्रीमंत माणूस कवितेच्या भानगडीत पडत नाही - प्रा.डाॅ.चंद्रकांत पालवे(ज्येष्ठ कवी) अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- कवितेचे रूप, रस, ग...
श्रीमंत माणूस कवितेच्या भानगडीत पडत नाही - प्रा.डाॅ.चंद्रकांत पालवे(ज्येष्ठ कवी)
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- कवितेचे रूप, रस, गंध कुठलाही असो पण ती मध्यमवर्गीय वा खालच्या स्तरातूनच लिहीली जाते. अतिश्रीमंत माणूस कवितेच्या भानगडीत पडत नाही. दुःख, दैन्य, दारिद्र्य, वेदनेचे चटके बसल्याशिवाय कवितेचा जन्म होत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी सदस्य ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.चंद्रकांत पालवे यांनी केले. एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित 36 व्या ऑनलाईन एकता काव्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषद चिंचवड शाखेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक मा.राजन लाखे यांनी केले. जम्मू येथून त्यांनी रसिक श्रोत्यांशी संवाद साधला.
एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य जेष्ठ साहित्यिक अनंत कराड, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, प्रदेश युवक सरचिटणीस बलराम मनिठे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालेल्या कविसंमेलनात माधवी देवळाणकर (कडी-गुजरात) यांनी 'पळस' कविता व 'पान कवळे' ही बैठकीची लावणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. पाथर्डीचे एड.अजित ठोंबरे यांनी 'हुंडा' ही ज्वलंत सामाजिक विषयावरील रचना पेश करत उपस्थितांना अंतर्मुख केले. तद्नंतर धारूर जि.बीड येथील कवयित्री मिनाक्षी मुंडे यांच्या 'कुणबी' व 'वेलीवरची फुले' या रचनांनी माहोल बदलून टाकला तर त्यांची कन्या साक्षी हिने 'बलात्कार' ही कविता ऐकवत महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडली. 'फणा' व 'ऊस तोडणारी माय' या कष्टकऱ्यांच्या जीवनावरील वास्तववादी रचना आष्टी चा उमदा कवी अजय भराटे याने पेश करून वातावरणात गंभीरता आणली. पाथ्री जि.परभणी चे शेतकरी कवी विठ्ठल चव्हाण यांनी 'बाप' व 'कसं होईल देवा' या शेतीमातीशी निगडीत कविता ऐकवून शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली तर शिरूर कासार जि.बीड येथील ग्रामीण कवी हनुमंत काळे यांनीही 'शेतकरी आत्महत्या' व 'शेतकरी बाप' या कास्तकारांच्या वेदना सांगणाऱ्या कविता सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. परळी वैजीनाथ चे नामदेव गित्ते यांच्या 'माय' रचनेने श्रोते भारावून गेले. कविसंमेलनाध्यक्ष डाॅ.पालवे यांची 'सुख झरतच असते' ही कविता दाद मिळवून गेली.
तब्बल अडीच तास रंगलेल्या या काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन अहिल्यानगर चे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कवी डाॅ.अमोल बागूल यांनी केले. त्यांच्या 'शेती नाशकाचे प्रयोग' या कवितेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संमेलनाचे प्रस्ताविक एकता फाउंडेशन शेवगाव तालुकाध्यक्ष प्रदीप बोडखे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवीदास शिंदे यांनी केले. यावेळी एकताचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, परभणी जिल्हा महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे, परभणी जिल्हा उपाध्यक्षा मेघा नांदखेडकर, युवती आघाडीच्या नेहा कुमावत, जालिंदर साळुंके, भागवत कंठाळे, मयुर गायकवाड, अशोक तिडके, सखाराम गोरे, शितल जाधव, सुमित्रा गित्ते, सुरेश शिंगरे, स्वाती कानडे, सॅम मेकाले, दिपक पाठक, आरती पवळ, सुरेश पवळ, बाबासाहेब नागरगोजे, संजय खताळ, सविता फड, शुभांगी गित्ते, अलका सपकाळ यांच्यासह राज्यभरातील रसिक श्रोते उपस्थित होते.
No comments