Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांगीण जबाबदारी आहे-सुभाष सोनवणे(ज्येष्ठ साहित्यिक)

  मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांगीण जबाबदारी आहे-सुभाष सोनवणे(ज्येष्ठ साहित्यिक)                         अहिल्यानगर प्रतिनिधी बाळा...

 मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली सर्वांगीण जबाबदारी आहे-सुभाष सोनवणे(ज्येष्ठ साहित्यिक)

                       



अहिल्यानगर प्रतिनिधी बाळासाहेब कोठुळे- मराठी मातृभाषा ही ममताळू ,कनवाळू ,प्रेमाळू व आनंदाळू अशी असून ती लयबद्ध अशी भाषा आहे. ही भाषा खूप गोड व सुंदर आहे. प्रत्येक शब्द हा विविधतेने नटलेला असून आपल्या मातृभाषेचा आपल्या सर्वांनाच खऱ्या अर्थाने अभिमान असायला हवा. या भाषेची संवर्धन व जपणूक ही कवी लेखक विचारवंत व साहित्यिकांची जबाबदारी नसून सर्वसामान्य तळागाळातील माणसांनी सुद्धा तिची जपवणूक व संवर्धन केले पाहिजे. असे विचार  साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे यांनी व्यक्त केले.

              जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अहिल्यानगर येथील शिशु संगपन संस्थेच्या माळीवाडा येथील विद्यालया मध्ये आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित 

कार्यक्रमा मध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री दिलीपजी गुंदे सर चेअरमन शिशु संगोपन संस्था अहिल्यानगर हे होते. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे श्री किशोर मरकड अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, अहिल्यानगर तसेच ॲड. विजय मनोज ,राजेश झालानी , रा.धो. कासवा ,व्हा. चेअरमन दशरथजी खोसे , प्राचार्य दत्तात्रेय कसबे मुख्याध्यापका सौ.योगिता गांधी यांच्यासह अनेक मान्यवर  कार्यक्रमाच्या विचार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना सुभाष सोनवणे म्हणाले की, मराठी भाषेला खूप जुना इतिहास असून त्या काळी महानुभव संप्रदायाचे चक्रधर स्वामी यांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेतून  लेखन करुन समाजा समोर ठेवले आहे .संत ज्ञानेश्वरांनी तर भावार्थ दीपिका व इतरही काही ग्रंथांमध्ये मराठी भाषेचे  गोड सुंदर व सौंदर्याने नटलेले खरे रूप ओवीबद्ध रुपाने समाजाला दाखवले आहे. महाराष्ट्रातील संत पंत व संतांनी माय मराठी भाषेला आपल्या लिखाणातून कवणा मधून गाण्यां मधून लोकगिता मधुन उच्च शिखरावर नेऊन ठेवलेले आहे. ह्या भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. ही भाषा खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा व्हावी महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषा विषय हा सक्तीचा करणे काळाची गरजेचे आहे. आपल्या भाषणात त्यांनी आपल्या काही  कविता ही सादर केल्या.

यावेळी किशोरजी मरकड यांनी आपले बहुमोल विचार मांडले. मराठी भाषेचे संवर्धन होणे व तिला जपणे ही काळाची गरज आहे. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीपजी गुंदेचा आपल्या भाषणात म्हणाली की, आपण सर्वांनी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला हे आपले सर्वांचेच भाग्य आहे .या माय मराठी मातृभाषेचा सततच गर्व व अभिमान असून तिचे संवर्धन व जपवणूक तळागाळापर्यंत व्हावी.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे व्हा.चेअरमन श्री दशरथ खोसे सर यांनी केले .यावेळी काही विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी आपल्या कविता सादर केल्या. प्रमुख वक्ते प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

No comments