एक मार्चपासून गळीतास येणाऱ्या ऊसास भोगावती देणार शंभर रुपये जादा दर कौलव/ संदिप कलिकते शाहूनगर परिते येथील श्री भोगावती सहकारी साखर कारख...
एक मार्चपासून गळीतास येणाऱ्या ऊसास भोगावती देणार शंभर रुपये जादा दर
कौलव/ संदिप कलिकते
शाहूनगर परिते येथील श्री भोगावती सहकारी साखर कारखाना एक मार्चपासून गळीतास येणाऱ्या ऊसास शंभर रुपये जादा दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केली आहे
भोगावतीचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून ज्या सभासदांचा ऊस एक मार्चपासून ते गळीत हंगाम संपेपर्यंत गळीतास येणार ऊसाला 3300 रुपये प्रति टन दर मिळणार आहे
कारखान्याने आत्तापर्यंत 89 दिवसात तीन लाख 89 हजार 250 टन ऊस गाळप करून चार लाख 84 हजार 210 साखरपोती उत्पादित केले आहेत सरासरी साखर उतारा १२.४८ ते १३.२८ असा आहे
कारखान्याने आतापर्यंत 31डिसेंबर पर्यंत आलेल्या उसात प्रति टन 3200 रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत एक ते पंधरा जानेवारी या कालावधीत आलेल्या उसास प्रति टन 3200 होणारी रक्कम येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे
यावेळी उसाच्या उत्पादनामध्ये कमालीची घट असून त्याचा परिणाम कारखान्याच्या क्रसिंगवर होणार आहे . कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिल्लक असलेला ऊस भोगावती कारखाना गळीतास नेणार असून शिल्लक असलेला ऊस सभासदांनी भोगावतीला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजेंद्र कवडे व संचालक मंडळ यांनी केले आहे
No comments