Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा – शशांक बाल विहार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आधारवाडी कल्याण

  मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा – शशांक बाल विहार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आधारवाडी कल्याण आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी शशांक बाल...

 मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा – शशांक बाल विहार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आधारवाडी कल्याण



आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी शशांक बाल विहार प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आधारवाडी कल्याण येथे मराठी भाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" या अभिमान व्यक्त करणाऱ्या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेचा अभिजात दर्जा, मराठी साहित्यकारांचे योगदान याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवर समाजसेवकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी लोकसभा वाहतूक व रस्ते अध्यक्ष अजय भानूशाली सर आणि मनसे चित्रपट सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विशाल बार्निस सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, जसे की पेन, पेन्सिल, वह्या आदींचे वाटप केले. मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर ट्रॉफी व शाल देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित प्रमुख व्यक्तींचा समावेश:

प्रा. प्रकाश माळी

प्रा. प्रमोद जोशी

ॲड. बंडू घोडे

अनिता कळसकार

मनज खरात

ॲन्टीक्रप्शन पोलीस रामेश्वर खरूळे

शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रलेखा गायकवाड

शिक्षिका वैशाली पाटील, सुनिता खैरनार

गोवारी सर

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व मान्यवरांचे मौल्यवान योगदान लाभले. जय महाराष्ट्र!





No comments