Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

श्रीक्षेत्र हरी हरेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!

 * श्रीक्षेत्र हरी हरेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!* ▪️मठाधिपती हभप गणपत बाबांचा पन्नास वर्षाचा उपवास▪️ अहि...

 *श्रीक्षेत्र हरी हरेश्वर देवस्थान येथे महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी!*



▪️मठाधिपती हभप गणपत बाबांचा पन्नास वर्षाचा उपवास▪️


अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव जवळील

हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या  श्रीक्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने हजारो भाविक भक्तांनी महादेवाच्या पिंडीवर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.



तोंडोळी आणि पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान महादेव दरा हे गेल्या अनेक वर्षापासून पाथर्डी शेवगाव सह अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. या देवस्थानला पौराणिक काळापासून धार्मिक महत्त्व आहे मठाधिपती श्री गणपत बाबा यांनी अत्यंत साधेपणातून आणि सरळ भावनेतून संस्थानाच्या विकासासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न केले आहेत.


श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थान ची आख्यायिका फार पौराणि क आणि वैशिष्ट्यपूर्णअसल्याची नोंद देवस्थानच्या वतीने दर्शनी भागावरील फलकावर लावण्यात आली आहे. त्यातून देवस्थानचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. ऐतिहासिक धार्मिक ग्रंथ शिवलीलामृत या ग्रंथात बाराव्या अध्यायात या हरिहरेश्वर देवस्थानचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते.



बुधवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिरूर पाथर्डी शेवगाव नेवासा आदी सह विविध गाव वाड्यावर त्या आणि तांड्यावरील महिला भगिनी आणि भाविक भक्तांनी मोठ्या भक्ती भावाने या पवित्र दिनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. पुराना मध्ये भस्मासुराचा नाश करण्यासाठी भगवान महादेव व त्यांचे गुरु भगवान विष्णू जेव्हा मृत्यू लोकांमध्ये आले होते त्यावेळी पार्वती माते ने या ठिकाणी दोघेही एकरूप व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती याचा उल्लेख शिवलीलामृत या ग्रंथांमध्ये आढळतो पार्वती मातेच्या इच्छेला या दोघांनी मान्यता दिली हर हरी दोघेही लिंगाच्या आकारामध्ये रूप धारण करून या ठिकाणी स्थिरावले व भगवान शंकर तदनंतर कैलासाला व भगवान विष्णू वैकुंठाला गेले मात्र पार्वती माता याच ठिकाणी स्वयंभू मूर्ती स्वरूपात आहे अशी आख्यायिका पुराणांमध्ये सांगितली आहे त्यामुळे महाशिवरात्रीला व श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी दर्शनासाठी गर्दी असते यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना देवस्थानच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले. तोंडोळी पासून काही अंतरावर डोंगर दर्यात असलेले हे देवस्थान नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत देखणे विलोभनीय आणि निसर्गरम्य  आहे डोंगराच्या कुशीमध्ये हे ठिकाण असून बाजूला गर्द झाडाझुडपांनी डोंगर आच्छादल आहे बाजूला पाण्यासाठी मोठा तलाव आहे.


महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र हरिहरेश्वर संस्थान महादेव दरा तोंडोळी येथे ज्येष्ठ पत्रकार आणि एकता फाउंडेशनचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब कोठुळे यांनी आवर्जून भेट देत दर्शन घेतले देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांचे बरोबर सामाजिक कार्यकर्ते कारभारी शिंदे राजेंद्र उदारे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला शेवगाव पाथर्डीच्या कर्तव्यदक्ष आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीने भाविक भक्तांना फराळासाठी सीधा सामग्री देण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा राजळे यांनीही मनोभावे दर्शन घेतले.


तसेच महाराष्ट्र एकता फाउंडेशनचे शेवगाव तालुका कोषाध्यक्ष प्रा.बिभीषण चाटे, इन्स्पेक्टर  राजेंद्र दराडे, तेजस दराडे यांच्यासह मान्यवरांनी देवस्थानचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी संस्थांचे मठाधिपती श्रीयुत ह भ प गणपत बाबा यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन आशीर्वाद देत स्वागत केले. पाथर्डी पोलीस स्टेशन प्रमुख संतोष मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मस्के साहेब यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता यावेळी होमगार्ड राजेंद्र उधारे यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा या ठिकाणी उपस्थित होता


यावेळी हरिहरेश्वर संस्थानचे हभप गणपत बाबा वरुटे, हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज वारंगुळे, डॉ. पांडुरंग पोकळे, बाबासाहेब खेडकर, बाळासाहेब वाघ राणेगाव, शरद मुळे, उद्धव वारंगुळे, बापूराव वारंगुळे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.





श्री क्षेत्र हरेश्वर संस्थानचे मताधिपती हरिभक्ती परायण गणपत बाबा वरुटे यांनी गेल्या पन्नास वर्षापासून केवळ फलाहार घेत निरंतर उपवास केलेला आहे. एकूणच त्यांच्या या श्रद्धेची विशेष कौतुकास्पद चर्चा होऊन देवस्थान वरील श्रद्धेमुळे या वयात ही त्यांची त्यागाची भावना अधोरेखित होते, असे यावेळी डॉ.पांडुरंग पोकळे यांनी लोकशक्ती न्यूज शी बोलताना  सांगितले.

No comments