ओकार उदारे राज्यस्तरीय काव्य लेखन मध्ये उत्तेजनार्थ अहील्यनगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ व श...
ओकार उदारे राज्यस्तरीय काव्य लेखन मध्ये उत्तेजनार्थ
अहील्यनगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावे साहित्य संमेलन आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पाथर्डीचे शिघ्रकवी राजेंद्र उदारे यांचे चिरंजीव ओंकार रागिनी राजेंद्र उदारे यांनी माझा अभिमान हिंदुस्तान ही देशभक्तीपर कविता स्पर्धेत सादर केली होती. या कवितेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
रविवार दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, कव्यात्री शर्मिला गोसावी, कवी मारुती सावंत, कार्य भारत गाडेकर यांच्या उपस्थिती दुपारी साहित्य संमेलनामध्ये पार्थ विदया प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार असल्याची माहिती शब्दगंधचे सचिव सुनील गोसावी यांनी दिली आहे.
ओंकार च्या यशाबद्दल जिवाभावाची माणसं कसबा मंडळाचे अध्यक्ष बबनराव बोरुडे, खोलेश्वर यात्रा कमिटी अध्यक्ष भास्कर पाटील बोरुडे, सुनील शिंदे मित्र मंडळ, पावन गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आजिनाथ डोमकावळे,एकता फाउंडेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब कोठुळे, शेवगाव शाखा तालुकाध्यक्ष प्रवीण बोडखे,वैद्य नंदकिशोर औटी, डॉ. गुरुप्रसाद गोरे मित्र कसबामंडळाने अभिनंदन केले, सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments