Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर

 *शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण*  स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर   *रविवारी होणार उद्घाटन* अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- ...

 *शब्दगंध साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण* 

स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर 




 *रविवारी होणार उद्घाटन*


अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- *महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन शनिवार दि. ८ व रविवार दि.९ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीवनी तडेगावंकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या साहित्य संमेलनाची पूर्ण झाली असून साहित्यिक व साहित्य रसिकांनी  उपस्थित रहावे,असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा बारस्कर यांनी केले.* 

      साहित्य संमेलनाच्या कार्यस्थळास साहित्यनगरी नाव देण्यात आलेले असून शनिवारी सायंकाळी सात वाजता ज्येष्ठ कवी प्रा.डॉ.महावीरसिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन होणार आहे. या काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील, संदीप काळे व स्वाती ठूबे करणार आहेत. कविवर्य चंद्रकांत पालवे हे या काव्य संमेलनाचे समन्वयक आहेत. 

रविवार दि.९  फेब्रुवारी रोजी स.९  वा. पारिजात चौकापासून लोकसाहित्य जागर यात्रा निघणार आहे. या लोकसाहित्य जागर यात्रेमध्ये सर्व साहित्यिकांसह विविध वेशभूषा केलेले कलावंत सहभागी होणार आहेत. 

पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांचे विचारपिठास नाव दिलेले असून स.१०  वा. प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहिरी जलसा हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शाहीर भारत गाडेकर,डॉ. शेषराव पठाडे, शाहीर वसंत डंबाळे, शाहीर अरुण आहेर, दिगंबर गोंधळी,राम खुडे आणि  सहकारी सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान राऊत करणार आहेत.

त्यानंतर स.१/३० वाजता भव्य उद्घाटन समारंभ होणार असून यामध्ये संमेलनाध्यक्ष डॉ. संजीवनी तळेगावकर, पंधराव्या संमेलनाचें स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप, प्रमुख पाहुणे मा.आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ.सिद्धाराम सालेमठ,पंधरावा संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.राजेश गायकवाड, मनपाचे आयुक्त यशवंत डांगे, भाषा सल्लागार समितीचे सदस्य जयंत येलुलकर, माजी उपमहापौर गणेश भोसले, देवळाली प्रवरा चें मुख्याधिकारी विकास नवाळे, कॉम्रेड स्मिता पानसरे, दिनेश औटी,हेमंत पोखरणा इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी व पत्रकार मकरंद घोडके करणार आहेत. यावेळी प्राचार्य चंद्रकांत भोसले, मा.आ.साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना तर मातोश्री यमुनाबाई पांडुळे स्मृती पुरस्कार रत्नाताई कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर स्नेहल दाडर हिचा एकपात्री प्रयोग होणार आहे. 

स.११/४५ ला  सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन होणार असून यामध्ये अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. सुभाष सोनवणे,संगीता फसाटे, बबनराव गिरी हे सूत्रसंचालन करणार आहेत. दु.१ वा.अभिजात मराठी भाषा :  साहित्यिकांची जबाबदारी या विषयावर प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रा. डॉ. समाधान इंगळे, प्रा. डॉ. संदीप सांगळे, पत्रकार अविनाश मंत्री सहभागी होणार असून प्रा. डॉ.अनिल गर्जे, राजेंद्र पवार व राजेंद्र चोभे हे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यानंतर दुपारी २  वा. डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन सत्र होणार असून यामध्ये वि.भा.साळुंखे, विनय मिरासे, विलास सिंदगीकर हे आपल्या कथा सादर करणार आहेत.भाऊसाहेब सावंत व डॉ.संजय दवंगे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

       त्यानंतर दुपारी ३  वाजता राज्यस्तरीय कथा,कविता, निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या शुभहस्ते होणार आहे. सूत्रसंचालन डॉ.अशोक कानडे, डॉ.तुकाराम गोंदकर करणार आहेत तर दुपारी ३/१५  वाजता मराठी, हिंदी ,उर्दू गझल संमेलन डॉ. कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात तिन्ही भाषेतील गझलकार सहभागी होत आहेत. नाशिकचे बाळासाहेब गिरी व राज्याक शेख हे सूत्रसंचालन करणार आहेत. दुपारी ४/१५ र्वा  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आजची पिढी या विषयावर ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार असून यामध्ये हरिभाऊ नजन, डॉ. दत्ता निकरड सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष जाधव व प्रशांत सूर्यवंशी करणार आहेत. 

५ वा. समारोप व पुरस्कार वितरण समारंभ होत असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. बी. जी. शेखर पाटील, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, अरुणकाका जगताप, न्यू आर्टस महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी एड. कॉम्रेड सुभाष लांडे पाटील, प्राचार्य शिवाजीराव देवढे,हमाल पंचायत चे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, मा.नगरसेवक कुमारभाऊ वाकळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर मरकड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश वाघमारे व शर्मिला गोसावी करणार आहेत.

यावेळी प्राचार्य हिराचंद ब्राह्मणे स्मृती पुरस्कार प्रा. डॉ.शंकर चव्हाण व के.डी.सातपुते स्मृती पुरस्कार किशोर डोंगरे यांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार व सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

तरी या संमेलनास साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष संपतदादा बारस्कर, पै. शिवाजी चव्हाण, डॉ.सागर बोरुडे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, कार्यवाह भारत गाडेकर, राजेंद्र फंड,अरुण आहेर यांनी केले आहे.

No comments