श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे ४८ महिन्यात ६० योजना यशस्वीपणे राबविणारे उच्च शिक्षित सरपंच - हनमंत रुस्तुमराव धुळगंडे श्रीक्षेत्र माळेगा...
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे ४८ महिन्यात ६० योजना यशस्वीपणे राबविणारे उच्च शिक्षित सरपंच - हनमंत रुस्तुमराव धुळगंडे
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेची आदर्श गावाकडे यशस्वी वाटचाल
दक्षिण भारतात प्रसिध्द असलेले श्रीक्षेत्र माळेगाव ही आदर्श ग्रामपंचायत आणि ४८ महिन्यात साठ यशस्वी योजना राबविणारी ग्रामपंचायत होण्याची वाटचाल करीत आहे.
माळेगाव येथील एक सरपंच गावासाठी काय करु शकतो हे त्यांनी आपल्या गावात विविध योजना यशस्वीपणे राबवून आजच्या राजकारणी लोकांसाठी उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. नांदेड जिल्ह्याच्या राजकिय व सामाजिक क्षेत्रात सर्वोत्तम कार्य ज्यांनी केले ते स्व. रुस्तुमराव धुळगंडे यांचे २०१९ ला या जगाचा निरोप घेतला. व त्यानंतर राजकिय व सामाजिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या मुलांवर आली व २०२१ ला हनमंत रुस्तुमराव धुळगंडे यांना ग्राम पंचायत निवडणुकीला सामोरे जावे लागले , वय लहान जिमेदारी मोठी आणि निवडणुक म्हटली की आर्थिक स्थिती मजबुत असावी लागते पण तसी परिस्थिती खुप कठीण होती. पण गावातील जनतेचा आशीर्वाद आणि स्वतःचा आत्मविश्वास,संघर्ष करीत हि निवडणुक बहुमताने जिंकली आणि १२ फेब्रुवारी २०२१ ला सरपंच पदावर हनमंत रुस्तुमराव धुळगंडे हे श्रीक्षेत्र माळेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान झाले.
नवख्या सरपंचासमोर गावातील लोकांनी समस्यांचा पाढा वाचला पण या समस्या कश्या सोडवायच्या यासाठी हनमंत धुळगुंडे यांनी अनेक जणांचे मार्गदर्शन घेऊन एक - एक समस्या सोडवत गाव समस्या मुक्तीकडे वाटचाल करु लागले. त्यांनी आपल्या ओळखीचा व, चाणाक्क्ष बुध्दीचा फायदा घेत गावच्या विकासासाठी वेगवेगळ्या, कोठ्यावधी निधी खेचुन आण आणून गावचा ४८ महिन्यात गावचा चेहरा मोहरा बदलला. यात महाराष्ट्रात पहिला प्रयोग विहिरीवर(आडावर) हातपंम्प (हापसे) बसविले. तसेच उघड्यावर असलेल्या आडात कुणी पडून अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यावर जाळी बसवली,निजाम कालीन-२ तळ्याची दुरुस्ती केली.
गावातील लाईटच्या पोलला शाँक बसु नये या साठी प्रत्येक पोलला पीव्हिसी पाईप बसविणे. गावात सार्वजनिक ठिकाणी शैक्षणिक फलक, चालते - बोलते चित्र काढण्यात आले. गावात पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून एक दिवस दररोज पाणीपुरवठा केला. गावात भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम (व्यायाम शाळा) आणली, लाईट व्यवस्थित साठी- २० हँयमँक्य पोल बसवण्यात आले, गावात व तांड्यात
सिसी रोड करून पेव्हर ब्लँक बसवण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले.
पांदन रस्ते मंजुर करून ७५%पूर्ण केले.
आपल्या वैयक्तिक खर्चातुन सार्वजनिक डोली तयार करून गावकऱ्यांना भेट दिली. जि.प शाळा ,संजय गांधी शाळा ,संत बाळुमामा मंदिर या पाणी व्यवस्थितसाठी बोरवेलची व्यवस्था आणि वाश बेसिनची व्यवस्था केली.
गावातील शेतकऱ्यांसाठी ७० सिंचन विहिरी मंजूर करून आणल्या.
लिंबोटी धरण आंडगा येथून तीन कोटी पाच लक्ष रुपयाची जलजीवन अंतर्गत विहीर पाईपलाईन व टाकी मंजूर करून गावकऱ्याला देण्यात आलेल्या वचनाची वचनपूर्ती करण्यात आली, जि प आयुर्वेदिक दवाखान्याची दुरुस्ती,आरोग्य उपकेंद्र दवाखान्याची मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधकामसाठी ५५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून खेचून आणला.तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याची जुनी इमारत तशीच ठेवून नवीन भव्य दिव्य अशा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले, जलयुक्त शिवार ०.२ योजनेचा पाठपुरावा करून गावातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल.गावातील स्वच्छतेसाठी स्वतः सरपंच हनुमंत धुळगुंडे यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे,तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना शासनाकडून मदत मिळवून दिली. माळेगावातील खुप संघर्ष करून नविन नोकरी लागलेल्या तरुणाचा आणि त्याच्या आईवडिलांचा ग्रामपंचायत कडून सन्मान करून सरपंच हनमंत धुळगुंडे यांनी उल्लेखनीय कार्य केले आहेत.
यासोबत पदोन्नती झालेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयातर्फे सन्मान करण्यात येतो, सरपंचांनी शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे मंजूर करून दिले.गावातील निराधार महिलांना शासनाकडून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
सरपंच हनुमंत धुळगुंडे यांनी दरवर्षी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतात. २२ डिसेंबर २०२२ झालेल्या रेकॉर्ड ब्रेक नियोजनबद्ध यात्रा सरपंच हनुमंत धुळगंडे यांच्या नियोजनात यशस्वीपणे पार पडली त्यांनी या यात्रेस कोणतीही गालबोट लागू दिले नाही.
गावात डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पूतळा उभारला, लिंगायत समाज बांधवासाठी सभामंडप ,गूरव समाज बांधवासाठी सभामंडप, तलाठी कार्यालय नविन इमारत,घंटा गाडी,पाणी आडवा पाणी जिरवा, गोलबल बंधारा बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज पूतळा सुशोभिकरण,हटकर समाज बांधवासाठी १ कोटीचे सभागृह भूमिपूजन, भोई समाजबांधवांसाठी २० लाखाचे सभागृह भूमिपूजन.
सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेत शंकर पट चालू केले,गावातील गरजू व्यक्तीला आता पर्यत ३१४ घरकूल मंजुर,६० लाईट पोल व नविन विद्यूत डिपी ४ मंजुर,संपूर्ण गाव सि सी टीव्ही कॅमेरा ठेवण्यासाठी काम चालू, बंजारा समाजासाठी दहा लाखाचे सभागृह .ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दोन्ही तांडयात सीसी रोड करून ते काम पूर्ण केले अशी विविध कामे सरपंच हनुमंत धुळगंडे यांनी ४८ महिन्यात राबवून उल्लेखनीय कार्य करत श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत करण्यास अमूल्य असे योगदान दिले आहे.
विशेष म्हणजे त्यांचा गावातील अडचणीसाठी २४ तास मोबाईल सुरू असतो. आणि ते कोणत्याही वेळेस सर्वांची कॉल घेऊन अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात असे मत गावातील जनतेचे मत आहे , म्हणून गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वांचे आवडते सरपंच म्हणून परिसरात त्यांची ओळख आहे.
असा विकासमुख सरपंच, गावासाठी निधी खेचून आणणारा सरपंच आमच्या गावाला लाभला असे गावातील जनतेचे मत आहे.
नक्की एक दिवस माळेगाव यात्रेचे नाव विकासाची गंगा व एक आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द होईल यात काहिच शंका नाही. त्यांच्या सोबत या विकासाच्या कामात त्यांना सहकार्य करणारे उपसरपंच बालाजी नंदाने ,
सदस्य- केरबा धुळगंडे, सदस्य- गोपाळ पाटील ,सदस्य - बाबुराव वाघमारे ,सदस्य- गुणाजी जोंधळे ,सदस्य - पारोजी वाघमारे ,
सदस्य- संपती वाघमारे ,सदस्य -लक्ष्मीबाई राठोड,सदस्य-लक्ष्मीबाई गौकोंडे,सदस्य- साहेबराव राठोड,ग्रामपंचायत अधिकारी- बि.सी.देवकांबळे सर यांचे सहकारी मिळते.
No comments