कसदार साहित्य निर्मिती आवश्यक प्रा.डॉ. सुधकर शेलार अभिजात मराठी भाषा :साहित्यिकांची जबाबदारी परिसंवाद अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठ...
कसदार साहित्य निर्मिती आवश्यक
प्रा.डॉ. सुधकर शेलार
अभिजात मराठी भाषा :साहित्यिकांची जबाबदारी
परिसंवाद
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-" अभिजात मराठीला शोभेल अशी कसदार साहित्यनिर्मिती लेखकांनी करायला हवी... " असे मत अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुधाकर शेलार यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनातील 'अभिजात मराठी भाषा : साहित्यिकांची जबाबदारी' या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी छत्रपती संभाजी नगर येथील प्रा.डॉ.समाधान इंगळे, पुणे येथील प्रा. डॉ.संदीप सांगळे व पाथर्डी येथील अविनाश मंत्री हे या परिसंवादामध्ये सहभागी झालेले होते.
पुढे बोलताना डॉ. शेलार म्हणाले की, साहित्य दर्जेदार होण्यासाठी साहित्याची समीक्षा आवश्यक असते. लेखकांनी समीक्षेकडे सकारात्मकतेने बघायला हवे तरच साहित्य दर्जेदार होऊ शकेल. तसेच भाषा माणसांचा विकास करत असते, ज्ञानभाषा ही माणसाला ज्ञानवंत व आर्थिक सुबत्ताधारक बनवत असते, म्हणून ती महत्त्वाची असते. त्यामुळे सर्वांनीच आपली अभिजात मराठी टिकण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.'
प्रा. डॉ.संदीप सांगळे बोलताना म्हणाले की, 'तुम्ही ,आम्ही, आपण सगळे मराठी मिडीयम चे असून आपण आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत ,आता इंग्रजी माध्यमाचा जमाना आलेला असून तो टाळायला हवा, वेगवेगळे प्रयोग हे मराठी साठी व्हायला हवेत, नवे नवे शब्द जपून ठेवायला हवेत. प्रा.
डॉ.समाधान इंगळे यावेळी बोलताना म्हणाले की, ' पूर्वीही मराठी होती आणि यापुढेही मराठी राहणार आहे, ती अधिक समृद्ध होण्यासाठी साहित्यिकांनी कसदार साहित्याची निर्मिती करणे आवश्यक आहे, कसदार साहित्य निर्मिती झाली तर आपोआपच मराठी वाचकांची संख्या वाढेल आणि मराठी चिरताई टिकण्यासाठी त्याचा उपयोग होईल'
अविनाश मंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, " शहरी मुलांपेक्षा ग्रामीण मुलांमध्ये अधिक साहित्याची रुची असते ,तसेच मराठी वाचनावरही ते भर देत असतात ,म्हणून ग्रामीण भागातील मराठी भाषा ही कधीही हद्दपार होऊ शकत नाही, वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणारे विविध प्रश्न त्या भाषेतून व्यक्त झाल्यास अभिजात मराठी भाषा ला मिळालेला दर्जा कायमस्वरूपी टिकून राहू शकेल.'
एकंदरीतच या परिसंवादातून अभिजात मराठी भाषा टिकण्याची जबाबदारी साहित्यिक व समाजावरही असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. या परिसंवाद चे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अनिल गर्जे यांनी केले तर राजेंद्र पवार यांनी आभार मानले. राजेंद्र चोभे,प्रा.डॉ. किशोर धनवटे, मारूती सावंत यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संमेलनाध्यक्ष संजिवनी तडेगावंकर, स्वागताध्यक्ष संपत दादा बारस्कर,जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, प्रा. गिरीश सोनार, संजय सपकाळ, कोपरगावच्या माजी नगराध्यक्ष ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, तानाजी डाडर, उद्धव काळापहाड, रामदास कोतकर, रवींद्र सातपुते, प्रवीण गवळी, संदीप गोसावी,ज्ञानेश्वर मोरे,संतोष ब्राह्मणे, आदिनाथ पडोळे, राजकुमार घुले, डॉ. संजय दवंगे, सुनील गोसावी, राजेंद्र उदागे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments