Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये साजरा होणार तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा.

  इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये साजरा होणार तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमसाखर गावात ...

 इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावामध्ये साजरा होणार तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळा.



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमसाखर गावात तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, निमसाखर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हिप्नॉटिझम कार्यक्रम, पारंपारिक मिरवणूक व स्नेहभोजन इत्यादी उपक्रमांचा समावेश असून गावात विविध क्षेत्रातील भरीव योगदान असणाऱ्या विध्यार्थी व अधिकारी यांचा सन्मानदेखील करण्यात येणार आहे. दिनांक १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन गावातील ऐतिहासिक राजवाड्यातील मैदानावर सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पार पडणार असून उद्घाटनासाठी अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ श्री एम के इनामदार सर, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार डुणगे, मंडल अधिकारी श्री सतिश गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी श्री गणेश लंबाते, ग्राममहसूल अधिकारी श्री अनिल जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री मिलिंद मिठापल्ली, पशुधन पर्यवेक्षक श्री अमोल क्षीरसागर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



उत्सव सोहळ्याचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. गावातील नामांकित मंडळींनी आपल्यावतीने विविध सामाजिक व आर्थिक जबाबदाऱ्या विभागून घेतल्याने सोहळ्याची व्याप्ती वाढली आहे. या शिवजयंती उत्सव सोहळ्यात गावातील सर्व जातीधर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आत्तापासूनच गावाच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लागले असून गावात भगवेमय वातावरण होत आहे. निमसाखर मधील शिवजयंती ही तालुक्यातील सर्वात उत्साही शिवजयंती म्हणून ओळखली जाते.

No comments