समता बंधुता व विज्ञानाचे पाईक असणारे गुरु रविदास महाराजांचे विचार हे क्रांतीकारी होते-सुभाष सोनवणे अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-...
समता बंधुता व विज्ञानाचे पाईक असणारे गुरु रविदास महाराजांचे विचार हे क्रांतीकारी होते-सुभाष सोनवणे
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
माघ पौर्णिमा व गुरु रविदास महाराज जयंती निमित्त मालेगाव जिल्हा नाशिक येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुरु रविदास समता सामाजिक विचार मंच व मध्यवर्ती जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक उद्यान येथे दिनांक १२/२/२०२५ रोजी सायंकाळी व्याख्यान संपन्न झाले. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते कवी सुभाष सोनवणे यांनी आपल्या व्याख्यानात "गुरु रविदास यांचे विचार व आजची परिस्थिती" या विषयावर गुरु रविदास यांच्या अनेक दोह्यातील दाखल्यांचे संदर्भ देत विश्लेषण करत आपले व्याख्यान दिले. रविदासांच्या स्वप्नातील समतेचे व समानतेचे बेगमपुरा राज्य अजूनही देशात प्रस्थापित झाले नाही. व रविदास महाराज हे समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी व क्रांतिकारक असे संत होते. त्यांचा जन्म त्यांचे बालपण व त्यांचे मानवता संवर्धनीय कार्या बाबद माहिती दिली. तसेच युवकांनी आपल्या अभ्यासाबरोबरच आवंतर वाचन जास्त प्रमाणात करावे. माणसं वाचावे. निसर्ग वाचावा .ज्येष्ठांचे व निसर्गाचे संवर्धन करावे. त्याचप्रमाणे व्यसनांपासून दूर राहावे.असा एक मौलिक संदेश त्यांनी व्याख्यानातून यावेळी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक योगेश पाथरे सर होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर विष्णू आहेर साहेब तसेच संजयजी पथनानी ,कवी गझलकार राम गायकवाडसर ,चित्रकार अरविंद शेलार व समिती अध्यक्ष दिलीप पात्रे हे उपस्थित होते. अध्यक्ष योगेश पाथरे यांनी समाजाला एकजूट होऊन रविदास भवन बांधण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले या व्याख्यानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर महिलासह युवकवर्ग तसेच समाज बांधव व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी स्वागताध्यक्ष देविदास सुरांजे होते. नंदू भाऊ डावरे अंकुश सुरांचे युवराज अहिरे किरण राजवंशी राजेंद्र काचेपुरी मधुकर अहिरे शहर अध्यक्ष बाळूभाऊ पवार अशोक सुरांजे रमेश सुरांजे छगन अहिरे भारत सुरांचे दीपक पवार रवींद्र पवार लक्ष्मण पाथरे राजेंद्र अहिरे किरण सुरांजे व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र अहिरेसर यांनी केले.
No comments