वडगाव विद्यामंदिरच्या संरक्षक भिंतीच्या कामाला मुहूर्त कधी? प्रतिनिधी -साताप्पा कांबळे वडगाव (ता.कागल) येथील पंडित नेहरू विद्याम...
वडगाव विद्यामंदिरच्या संरक्षक भिंतीच्या कामाला मुहूर्त कधी?
प्रतिनिधी -साताप्पा कांबळे
वडगाव (ता.कागल) येथील पंडित नेहरू विद्यामंदिर शाळेच्या संरक्षक भिंतीचे साहित्य पावणेदोन वर्षांपूर्वी येऊन पडले आहे.मात्र अद्याप त्या कामाला मुहूर्त मिळाला नाही.त्यामुळे हे काम कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बाबर यांनी गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
वडगाव प्राथमिक शाळेची इमारत ओढ्याच्या काठावर आहे.इमारतीच्या मागील बाजुला खोल ओढा असल्याने त्यामुळे लहान मुलांना येथे धोकादायक स्थिती आहे.शाळेच्या इमारतीच्या पुढील बाजूस संरक्षक भिंत आहे . मागील बाजु रिकामी अशी स्थिती आहे.या भिंतीच्या कामाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळुन साहित्य आले आहे.मात्र वर्षांभर झाले तरी याकडे ठेकेदाराने किंवा प्रशासनाने पाहिले नाही.
चार महिन्यांपूर्वी मागील बाजुच्या ओढ्यातून शाळेच्या आवारात प्रवेश करून लहान मुलांना अनोळखी व्यक्तीकडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता.यावेळी मोठा गोंधळ उडाल्याने संशयित दोघेजण पळून गेले.मुरगुड पोलिसांनी त्वरित भेट देऊन शाळा व्यवस्थापन आणि नागरिकांना सावध केले.यावेळी पुन्हा भिंतीचे महत्व अधोरेखित झाले.तरी देखिल भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले नाही.
No comments