Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अभियानाची इस्लामपुर येथे घोषणा

  मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अभियानाची इस्लामपुर येथे घोषणा दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी इस्लामपुर येथे AAMPL आणि Natur's Pride या संस्थां...

 मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अभियानाची इस्लामपुर येथे घोषणा



दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी इस्लामपुर येथे AAMPL आणि Natur's Pride या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030" अभियानाची घोषणा करण्यात आली.


अभियानांतर्गत प्रमुख उद्दिष्टे:

1. खर्च आधा, उत्पादन दुप्पट

2. केमिकल मुक्त शेती

3. शेतकरी श्रीमंत, देश श्रीमंत

4. मृदा संवर्धन

5. शेतकऱ्यांसाठी मोफत मार्गदर्शन

घोषणा आणि ग्वाही:

जैविक आणि सेंद्रिय शेतीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन मा. इम्रान खतीब यांनी दिले.

भारतातील शेती विषमुक्त करण्याचा निर्धार मा. विनायक पाटील यांनी व्यक्त केला.

माती परीक्षण आणि सुपीकतेसाठी 80% जमीन व 20% पीक यावर लक्ष केंद्रित करण्याची योजना मा. कृष्णात पाटील यांनी मांडली.

2025 मध्ये पाच हजार एकर जमीन विषमुक्त करण्याचे आणि मिशनसाठी वेळ, बुद्धी व संसाधने देण्याचे आश्वासन AAMPL अध्यक्ष मा. एन. बी. जमादार यांनी दिले.

प्रमुख उपस्थित मान्यवर:

एस.बी. जमादार, योगेश नाईक, सुनीता महाडेश्वर, मलिकार्जुन कुंभार, एम. आर. पाटील, पोटेकर साहेब.

हे अभियान शेतकऱ्यांसाठी नवी दिशा ठरवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम ठरेल.


No comments