Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

माजी मंत्री संजय बनसोडे आणि खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते पत्रकार गोकुळ पवार यांना पुरस्कार प्रदान

 *माजी मंत्री संजय बनसोडे आणि खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते पत्रकार गोकुळ पवार यांना पुरस्कार प्रदान*  अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब...

 *माजी मंत्री संजय बनसोडे आणि खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते पत्रकार गोकुळ पवार यांना पुरस्कार प्रदान* 



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-         -उदगीर तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण-                            शिरूर:-(दि.24/02/2025)                                    उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने 2022-2023 या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.उदगीर शहरातील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय येथे सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लातूर विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक संचालक श्याम टरके हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे,खासदार डॉ.शिवाजी काळगे,पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांची उपस्थिती होती.पत्रकार गोकुळ पवार यांना उत्कृष्ट वार्ता आणि शाश्वत विकास वार्ता या दोन्ही गटातील द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहेत.पुरस्काराचे वितरण माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे आणि लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते करण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र आणि तीन हजार रुपये असे होते.या कार्यक्रमाला मराठवाड्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments