संत हे भक्तिमार्गावरील कल्पवृक्ष - प्रा. डॉ. घुले अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- संत हे भक्ती मार्गावरील कल्पवृक्ष असतात . भक्ती...
संत हे भक्तिमार्गावरील कल्पवृक्ष - प्रा. डॉ. घुले
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-
संत हे भक्ती मार्गावरील कल्पवृक्ष असतात . भक्ती मार्गावरील सर्व अडथळे संतांच्या मार्गदर्शनामुळे दूर तर होतातच त्याच बरोबर प्रत्येक प्रश्नावर योग्य समाधान संतांकडून प्राप्त होत असते . समाजाला योग्य दिशा व संस्कार देण्याची काम संतांच्या वाणीतून व कृती मधून घडत असते . असे मत प्रा . डॉ. राजकुमार घुले यांनी वडले येथील प्रवचन रुपी सेवेत व्यक्त केले . वडले येथे वार्षिक हरिनाम सप्ताह दि . 14 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे . संत वामनभाऊ व स संत भगवानबाबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गेल्या पंधरा वर्षापासून सप्ताहाची आयोजन करण्यात येते . या सप्ताह ते बोलत होते . संत हे समाजासाठी स्वतःच्या शरीराची झीज करतात . संत हे परोपकाराचे प्रतीक आहेत . संसारातील होरपळलेल्या जिवांना शितलता देण्याचे काम संत करत असतात . संतांच्या आशीर्वादाने अशक्यप्राय गोष्टीही सहज घडवून जातात . समाजातील अनिष्ट रूढी - परंपरा , अंधश्रद्धा यावर योग्य ठिकाणी घाव घालण्याचे काम संतांनी केलेलं आहे . एवढेच नव्हे तर परकीय आक्रमण काळात समाज , संस्कृती व धर्म टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य संतांनी केले . त्यांची चरित्रे हे समाजाचे दिशादर्शक असतात . असे त्यांनी सांगितले . कार्यक्रमास वडूले ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते .
No comments