पानिपत कार विश्वास पाटील यांच्या महानायक कादंबरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अवलोकन कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार कोल्हापूर-नेताज...
पानिपत कार विश्वास पाटील यांच्या महानायक कादंबरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अवलोकन
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार
कोल्हापूर-नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित महानायक कादंबरीचे अवलोकन केले. यावरूनच लेखक विश्वास पाटील यांचे लेखन किती दर्जेदार आहे हे दिसून येते.
विश्वास पाटील यांनी इयत्ता नववीच्या वर्गात असताना आपल्या लेखन कार्याला शुभारंभ केला. ऐन तारुण्यात त्यांनी पानिपत सारख्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या लिहून वाचक वर्गात आपले स्थान भक्कम केले. त्यांनी पांगिरा, झाडाझडती, संभाजी, महानायक, दर्द भरी दास्तान, महासम्राट अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. झाडाझडती या कादंबरीतून त्यांनी धरणग्रस्तांच्या व्यथा मांडल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या. पानिपत कादंबरी पासून ऐतिहासिक कादंबरी लेखनास सुरुवात केली. पानिपत ही कादंबरी वाचकांना खूपच आवडली. त्यापासून विश्वास पाटील हे पानिपत कार या उपाधीनेच ओळखले जाऊ लागले. संभाजी कादंबरी लिहिताना त्यांनी अनेक गड किल्ल्यांना भेटी देऊन वास्तववादी लेखन केले त्यामुळे ही कादंबरी फारच गाजली. तसेच दर्दभरी दास्तान या कादंबरीने अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास कसा संघर्षमय होता याची मांडणी केली. महानायक कादंबरी साठी त्यांनी जर्मनी व जपान येथे जाऊन सुभाष बाबूंच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेऊन लेखन केले आहे. महासम्राट ही कादंबरी अनेक भाषेत प्रकाशित झालीआहे.
लेखक विश्वास पाटील हे ऐतिहासिक कादंबरी लिहिताना प्रत्यक्ष तेथील स्थळांना भेटी देऊन लेखन करत असतात. त्यामुळे त्यांच्या कादंबरीतील मजकूर हा वास्तववादी असतो. साहजिकच वाचक वर्गाला कादंबरी भुरळ घालते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या इतर भाषेत प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे मराठी साहित्य क्षेत्रात एक उत्कृष्ट लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमाला मा. शरदचंद्रजी पवार यासारखे अनेक दिग्गज महनीय उपस्थित राहतात. यातूनच त्यांचे लेखन कार्य किती उच्च दर्जाचे आहे हे दिसून येते. साहित्य अकादमी सारख्या सदस्य पदी बिनविरोध त्यांची निवड झाली आहे. महानायक कादंबरीचे अवलोकन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केल्याने विश्वास पाटील यांच्या साहित्याचा सर्वत्र बोलबाला होत आहे. महासम्राट या कादंबरी पासून वाचक वर्ग विश्वास पाटील यांना पानिपत कार या उपाधी बरोबर महासम्राटकार म्हणून ओळखू लागला आहे. अनेक साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या साहित्याची दखल घेतली आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील महनिय व्यक्तींनी दखल घेतल्याने लेखक विश्वास पाटील यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विश्वास पाटील हे माजी जिल्हाधिकारी आहे. परंतु ते सर्वांना एक उत्कृष्ट ऐतिहासिक लेखक म्हणून परिचित आहे.
No comments