शिवतेज संघटनेकडून जिल्हा कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न प्रतिनिधी: प्रदीप जाधव शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला ...
शिवतेज संघटनेकडून जिल्हा कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी: प्रदीप जाधव
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात संक्रांती निमित्त हळदी, कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दैनिक रोकठोक वृत्तपत्राचे संपादक सुरेश माडकर, कार्यकारी संपादक डॉ.सुरेश राठोड, पोलीस उपअधीक्षक सदाशिव सदांशिव यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांनी संघटनेच्या कार्याविषयी आढावा घेऊन, आपल्या भाषणातून संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष शिवाजी गिरिगोसावी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महिला जिल्हा अध्यक्ष कविता कोंडेकर यांचा हस्ते उपस्थित सर्व महिलांना हळदी, कुंकू लावून वान भेट वस्तू व अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमास सारिखा वर्णे, ज्योती तोडकर, नीता गायकवाड, नीता पडळकर, सविता पाटील, अशोक शेटे, संतोष तोडकर, अरविंद पाटील, रामचंद्र जाधव, पत्रकार प्रदीप जाधव, समीर हसबनीस व भागातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
No comments