विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरता शिक्षक व आई वडिलांचे योगदान महत्त्वाचे असते-उद्धवराव वाघ (ज्येष्ठ नेते) अहिल्यानगर प्रतिनिधी (बाळासाहेब कोठु...
विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरता शिक्षक व आई वडिलांचे योगदान महत्त्वाचे असते-उद्धवराव वाघ (ज्येष्ठ नेते)
अहिल्यानगर प्रतिनिधी (बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील जवखेडे (खालसा) येथील श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ उर्फ अण्णा अध्यक्षपदावरून बोलत होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची शेती मातीशी नाळ जोडलेली असते दुष्काळी परिस्थितीवर मात करत ग्रामीण पालक पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतो त्यामुळे शिक्षण संस्थेमध्ये मुलांना संस्था मोफत शिक्षण देते शाळेतील शिक्षकही अध्यापनाचे अनमोल कार्य मोठ्या कार्य कुशलतेने व तत्परतेने करत आहेत या विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये आपल्या गावाची व शाळेची नाळ कधीच तोडू नये अशी भावना त्यांनी यावेळी आपल्या भाषणांमधून मांडली या कार्यक्रमास पाथर्डी येथील भाजपचे ज्येष्ठ नेते अजय भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच पाथर्डी येथील श्री ती लोक विद्यालयाचे कांकरिया सर व कविवर्य बाळासाहेब कोठुळे हे विचार मंचावर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे दमदार प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री संपत वांढेकर सर यांनी केले जवखेडे सारख्या ग्रामीण व दुर्गम भागात उद्धव अण्णा यांनी शिक्षण संस्थेचे रोपटे लावले व मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाची सोय झाली तसेच ज्या गावात बस येत नसायची त्या ठिकाणी शैक्षणिक संकुल उभे करून अखंड ज्ञानाची गंगा वाहती केली असा उल्लेख करत शाळेप्रती व संस्थे प्रती आदरांची भावना व्यक्त केली
प्रमुख मान्यवर अजय भंडारी कविवर्य बाळासाहेब कोठुळे प्राध्यापक मच्छिंद्र आधा ट सर संजय ससाने सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीं यांनीही आपले मनोगत व्यक्त करत आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली कविता आणि अलंकारिक शब्द रचना यांचा भाषणात पुरेसा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये हास्याची कारंजी व विनोदाचे फवारे अधून मधून उडत होते सभागृहामध्ये टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषणाला एक उंची प्राप्त झाली निरोप समारंभाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी श्री सादिक शेख यांनी सर्वांचे आभार मानले तर संपूर्ण कार्यक्रमाची बहारदार सूत्रसंचालन श्रीमती मिरपगार मॅडम यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments