Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

एकता फाउंडेशनच्या शेवगाव शाखेच्या उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला-

  एकता फाउंडेशनच्या शेवगाव शाखेच्या उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला- अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-शेवगाव येथील भारदे हायस...

 एकता फाउंडेशनच्या शेवगाव शाखेच्या उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला-



अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-शेवगाव येथील भारदे हायस्कूलच्या प्रांगणामध्ये एकता फाउंडेशनच्या शेवगाव शाखेचा उद्घाटन समारंभ काल मोठ्या थाटात संपन्न झाला एकताचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड सर व ख्यातनाम साहित्यिक उमेश घेवरीकर सर प्राचार्य शिवदास सरोदे हरीश शेठ भारदे पत्रकार रामनाथ रुईकर विनोद ठाणगे लक्ष्मण झिजु रके(संपादक-शेवगाव शिवार) गझलकर रज्जाक शेख ग्रामीण कवी आनंद साळवे साहित्य सेवा चे संपादक नितीन गायके संयोजक व शेवगाव शाखेचे अध्यक्ष प्रदीप बोडखे व इतर मान्यवर यावेळी व्यासपीठावर हजर होते तसेच या कार्यक्रमास एकता फाउंडेशन ची सचिव गोकुळ पवार कैलास खेडकर शिवलिंग परळकर देविदास शिंदे मल्हारी खेडकर छगन पालवे व सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सावरकर पत्रकार इमरान शेख व कवी बाळासाहेब कोठुळे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते 

      यावेळी उपस्थित साहित्यप्रेमींना मार्गदर्शन करताना प्राध्यापक उमेश घेवरीकर सर म्हणाले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हे सुद्धा कवी होते तत्कालीन परिस्थितीत संत साहित्याच्या माध्यमातून सामाजिक दांभिकतेवर त्यांनी लेखणीच्या माध्यमातून प्रहार केला व भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम केले आणि तेच खरे विद्रोही साहित्यिक म्हणून पुढे आले आज आभासी जीवन पद्धतीमुळे माणूस आत्मिक आनंद हरवत चालला आहे शाळा महाविद्यालय यामधून विद्यार्थी उदासीन अवस्थेत जीवन जगताना दिसत आहे मराठी आणि इंग्रजी अशी गोंधळाची अवस्था तयार झाली आहे त्यामधून उद्याच्या भविष्याची मुलांना स्वप्ने कुठल्या भाषेत पडतील इंग्रजी की मराठी अशी समस्या येणाऱ्या काळात तयार झाले आहे त्याकरता साहित्याच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकली पाहिजे व एकता सारख्या सामाजिक व साहित्यिक संस्था पुढे आल्या तरच समाजाला त्या दिशा देऊ शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले व एकता फाउंडेशनच्या कार्याचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले तसेच अनंत कराड सर यांनीही उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले असतील झालेला समाज मार्गस्थ करायचं असेल तर एकदा हे काम करत असून साहित्य व सांस्कृतिक तसेच सामाजिक चळवळीमध्ये गेली बारा वर्षे पासूनचे योगदान सरांनी आपल्या भाषणातून मांडले वन्यजीवांचे संरक्षण पर्यावरण आरोग्य व साहित्य या क्षेत्रात एकताचा प्रगतीचा आलेखच आपल्या भाषणातून त्यांनी मांडला होता संस्थेचे सचिव गोकुळ पवार यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेची भूमिका व कार्य विशद केले

   द्वितीय सत्र मध्ये निमंत्रितांचे काव्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक उमेश घेऊरीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले त्यामध्ये ग्रामीण कवी आत्माराम शेवाळे आनंदा साळवे रज्जाक शेख नितीन गायके राजेंद्र उदारे वसंत सुरवसे सविता ढाकणे पुनम राऊत जयश्री खाडे अण्णासाहेब बोडखे अरुण तमानके बाबासाहेब अंधारे अण्णासाहेब तहकीक कुमारी वैदेही देवणे निलेश मोरे प्रदीप बोडके डॉक्टर बेनझीर शेख निवृत्ती महाराज कानवडे गौतम वाघमारे व बाळासाहेब कोठुळे या कवींनी सहभाग घेतला होता यावेळी शेवगाव शाखेच्या कार्यकारणी जाहीर केली त्यामध्ये अध्यक्ष -प्रदीप बोडके उपाध्यक्ष-आत्माराम जी शेवाळे सल्लागार -उमेश घेवरी कर मार्गदर्शक-लक्ष्मण झिंजुर्के प्रसिद्धीप्रमुख-रामनाथ रुईकर कोषाध्यक्ष-बिबीशन चाटे (पत्रकार) सचिव-निलेश मोरे सर महिला प्रतिनिधी वसुधा सावरकर पुनम राऊत सविता ढाकणे जयश्री खाडे तसेच विनोद ठाणगे संतोष मस्के निमंत्रक-अण्णासाहेब बोडके कार्याध्यक्ष-वसंत सुरवसे या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली तसेच गेल्या महिन्यामध्ये पाथर्डी शाखेची निर्मिती झाली त्यांचीही पद नियुक्ती यावेळी करण्यात आली अध्यक्ष राजेंद्र उदारे उपाध्यक्ष-कृष्णा रेपाळ कार्याध्यक्ष-अमोल सोळशे खजिनदार-संदीप काटे प्रमुख सल्लागार-हुमायून आतार सचिव-सुभाष भागवत संघटक-योगेश विधाटे प्रसिद्धीप्रमुख-पत्रकार अनिल खाटेर मार्गदर्शक-नंदकिशोर आवटे व आत्माराम बिडवे सदस्य दादाभाऊ ढमाळ गणेश वाघ अरुण ताठे नवनाथ तरटे आनंदा पंडागळे या कार्यकर्त्यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला शेवटी निलेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोठुळे यांनी केले

No comments