वाहतुकीच्या नियमाचे पालन करूनच वाहन चालवावे - हमीद शेख(पोलीस उपनिरीक्षक)- अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील दादा...
वाहतुकीच्या नियमाचे पालन करूनच वाहन चालवावे - हमीद शेख(पोलीस उपनिरीक्षक)-
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-पाथर्डी तालुक्यातील दादा पाटील राजळे महाविद्यालयातील करिअर कट्टा - स्पर्धा परीक्षा केंद्र आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र,अहिल्यालगर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक हमीद शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . रस्त्यावरून प्रवास करताना नियमांचे पालन प्रत्येकाने करावे . गाडी चालवण्याचा परवाना, रस्ते नियम, हेल्मेट वापरणे, वाहने चालवताना फोन न वापरणे अशा गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत . स्वतःच्या व इतरांच्या जीवनाच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने वाहन चालवले पाहिजे . एवढेच नाही तर काही लोक स्वतः सह इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात . वेळेचे नियोजन प्रत्येकाने करावे . उशिरा घरामधून निघून घाई -घाईने रस्त्यावर वाहने चालवल्याने अपघात घडत असतात . रस्त्यावर वेगाची मर्यादा ओलांडू नये . चार चाकी चालवताना सीट बेल्ट वापरणे आवश्यक आहे . सर्वांनी जर नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण घटेल . असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजकुमार घुले यांनी वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा घालण्याचा दृष्टिकोनातून राबविण्यात येणारा रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दुचाकी व चार चाकी वाहने चालविताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर व कार्यालयीन अधीक्षक श्री. विक्रमराव राजळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गायकवाड यांनी केले तर प्रा. चंद्रकांत पानसरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले . कार्यक्रमास हवालदार अरुण हाडके, सुनील आव्हाड, बाबासाहेब मंचरे, प्रा. रोहिणी मरकड, प्रा. तेजस्विनी राजळे , सौ. अश्विनी मरकड, श्री. भाऊसाहेब म्हस्के व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments