दादा पाटील राजळे महाविद्यालयात कॅम्पस टूर व कार्यशाळा संपन्न . अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-दादा पाटील राजळे कला , विज्ञान व TV...
दादा पाटील राजळे महाविद्यालयात कॅम्पस टूर व कार्यशाळा संपन्न .
अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-दादा पाटील राजळे कला , विज्ञान व TV वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट 2.0 संपर्क अभियान अंतर्गत कॅम्पस टूर व कार्यशाळा संपन्न झाली . यासाठी कै. रघुनाथ पाटील वाघ उच्च माध्यमिक विद्यालय जवखेडे व दादा पाटील राजळे उच्च माध्यमिक महाविद्यालय यातील विद्यार्थी यांनी महाविद्यालयास भेट दिली . महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयाचा परिसर , प्रयोगशाळा , ग्रंथालय , मैदान, प्रयोगशाळा, सोलर सिस्टम, तसेच विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्कूल कनेक्ट प्रोग्राम घेण्या मागची भूमिका डॉ. एम. एस. तांबोळी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितली. दादा पाटील राजळे महाविद्यालय हे ग्रामीण भागातील एक सर्व सुविधायुक्त महाविद्यालय असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणारे तसेच अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे परिसरातील एक उत्कृष्ट असे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवत आहे असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे त्यांनी आपल्या प्रस्ताविक पर भाषणात सांगितले.
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव राजळे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कशाप्रकारे रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे .टेमकर यांनी महाविद्यालयात कोणकोणत्या सुविधा व उपक्रम होतात याची माहिती दिली. कार्यक्रमाकरिता दादा पाटील राजळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळे, प्रा. राजेंद्र इंगळे व इतर स्टाफ ,कै. रघुनाथ पाटील वाघ कनिष्ठ महाविद्यालयाचे आधाट सर,
मीरपगार मॅडम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के.जी गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.आर. टी घोलप यांनी मानले.
अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली . यावेळी संस्थेचे सचिव बी .एम . गोरे , कार्यालयीन अधीक्षक श्री .विक्रम राजळे, पत्रकार बाळासाहेब कोठुळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .
No comments