Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात दीपक महाले यांचा सहभाग

  आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात दीपक महाले यांचा सहभाग अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)- पुणे येथे बालगंधर्व कलादालनात नुकतेच ती...

 आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवात दीपक महाले यांचा सहभाग




अहिल्यानगर प्रतिनिधी-(बाळासाहेब कोठुळे)-


पुणे येथे बालगंधर्व कलादालनात नुकतेच तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात येथील व्यंगचित्रकार दीपक महाले यांच्या व्यंगचित्रांचा समावेश होता. युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संयोजन व्यंगचित्रकार धनराज गरड यांनी केले.

                  विविध सामाजिक, राजकीय विषयांवरील व्यंगचित्रे तसेच अर्कचित्रे महोत्सवात प्रदर्शित करण्यात आली होती. महोत्सवाचे उद्घाटन पत्रकार अविनाश भट यांच्या हस्ते झाले. यावेळी  आमदार रोहित पवार, व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, चारूहास पंडित, लहू काळे, घनश्याम देशमुख यांची मंचावर  प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यंगचित्रकारांच्या प्रात्यक्षिकांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

                                                          प्रसिद्ध व्यंगचित्रकार दीपक महाले

      व्यंगचित्रकार दीपक महाले यांची व्यंगचित्रे विविध दैनिकांतून, दिवाळी अंकांतून प्रकाशित झाली आहेत.

No comments