कवी शशिकांत गायकवाड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर अहिल्यानगर प्रतिनिधी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ ...
कवी शशिकांत गायकवाड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर
अहिल्यानगर प्रतिनिधी प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक व समाज प्रबोधनकार शशिकांत गायकवाड यांना तेजस फाउंडेशन नाशिक या संस्थेचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2025 नुकताच जाहीर झाला आहे संस्थेचे अध्यक्ष सिने अभिनेत्री मेघा डोळस यांनी शशिकांत गायकवाड सर यांना निवड पत्राद्वारे कळवले आहे 23 जानेवारी रोजी डॉक्टर मौलाना आझाद संशोधन केंद्र संभाजीनगर या ठिकाणी एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे शशिकांत गायकवाड हे गेली वीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य महाराष्ट्रात करत आहे समाजातील अनेक अनिष्ट प्रथा व भोंदूगिरी चा त्यांनी पर्दाफाश केला आहे तसेच प्रवचन व कीर्तनातून समाजातील दांभिक गोष्टीवर त्यांनी प्रहार केला आहे त्याबद्दल त्यांना साने गुरुजी पुरस्कार अनिस कार्य गौरव पुरस्कार मराठवाडा भूषण पुरस्कार क्रांतीसुर्य महात्मा फुले पुरस्कार समाज रत्न पुरस्कार अहिल्याबाई होळकर पुरस्कार तसेच पार्थ भूषण पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरामधून त्यांचे अभिनंदन होत आहे
No comments