के के न्यूजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा: युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट कोल्हापुरातील प्रख्यात के के न्यूज यूट...
के के न्यूजच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा: युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
कोल्हापुरातील प्रख्यात के के न्यूज यूट्यूब चॅनेलने वर्धापन दिन साजरा करत एक कोटीपेक्षा अधिक ग्राहकांचा टप्पा गाठल्याबद्दल कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
या खास प्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर शेळके आणि करवीर तालुकाध्यक्ष पांडुरंग बेलेकर यांनी के के न्यूजला सदिच्छा भेट दिली. त्यांनी संस्थेच्या या यशाबद्दल अभिनंदन करत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सागर शेळके म्हणाले, “के के न्यूजने ग्रामीण भागातील विविध समस्या व बातम्या मांडण्याचे कार्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. यापुढेही हे यश कायम राहो, ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना.”
पांडुरंग बेलेकर यांनी टीमला प्रोत्साहन देत म्हटले, “तुमच्या मेहनतीमुळे आज के के न्यूज कोल्हापुरातील एक विश्वसनीय यूट्यूब चॅनेल बनले आहे. अशाच प्रकारे पुढेही यश मिळत राहो.”
संपूर्ण के के न्यूज टीमला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
No comments