Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

बोबडे नाना एक माणुसकीचा नितळ झरा-सुभाष सोनवणे (ज्येष्ठ साहित्यिक/व्याख्याते)

  बोबडे नाना एक माणुसकीचा नितळ झरा-सुभाष सोनवणे (ज्येष्ठ साहित्यिक/व्याख्याते) अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे- माणसाला माणसांशी  जोडण...

 बोबडे नाना एक माणुसकीचा नितळ झरा-सुभाष सोनवणे (ज्येष्ठ साहित्यिक/व्याख्याते)



अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-

माणसाला माणसांशी 

जोडणारा पाहिला मी  |

प्रेम भावे काळजाला 

ओढणारा पाहिला मी ||


आदरणीय ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असणारे बोबडे नाना.... यांचे पूर्ण नाव रामचंद्र खंडेराव बोबडे.

नानांचे वय ८३ वर्षे होते. नानांचे मुळगाव हिंगणीगाडा तालुका दौंड जिल्हा पुणे.नानांचे शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत  झालेले होते. त्यांचे बालपण तसं खूप संघर्षमय गेलेले असावे. नानांना पाच भाऊ. आई-वडिलांची परिस्थिती तशी जेमतेमच होती. त्यामुळे नानांना चौथीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. आणि लहानपणा पासूनच कुटुंबाला ते हातभार लावण्याचे काम करु लागले. निसर्ग व मानवतेच्या शाळेमध्ये शिकलेले नानांचे आई-वडील अतिशय तरल अंत:करणाचे होते. माणसातील माणूसपण जपणा-या  त्यांच्या वडीलांकडून त्यांना  हा अतिशय मौलिक असा खजिना अनुवंशिकतेने नानांच्याही स्वभावा मध्ये आलेला होता. आई-वडिलांचे आभाळा माये खाली व निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना मिळालेले संस्कार हे अतिशय लाखमोलाचे होते. त्याच बरोबर नानांना लहानपणा पासूनच माणसं वाचण्याची आवड निर्माण झाली होती. माणसांची सुसंवाद करण्याची आवड होती. त्याच बरोबर निसर्ग वाचण्याची सुद्धा त्यांना आवड होती. निसर्गातील अनेक बारकावे नाना टिपत होते .त्यांचे सर्व बालपणच निसर्गाच्या सानिध्यात गेलेला होतो. त्यामुळे थोरले वृक्ष, झुडपे ,कीटक, पक्षी ,प्राणी यांच्यावर नाना लहानपणा पासूनच प्रचंड प्रेम करायचे. दया करायचे. त्यांचा संगोपन करायचे. नाना जसे मोठे होऊ लागले तसे  माणसांच्या अंतर्मनाचाही  वेद घेऊ लागले. आणि त्या अनुषंगानेच एक सृजनशील प्रगल्भता त्यांच्या अंतर्मना मध्ये निर्माण झाली. आणि याचाच परिपाक म्हणून अतिशय लहान वयामध्येच म्हणजे विस ते एकविस वर्षां मध्येच नानांना लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले. नाना निवडणुकी मध्ये निवडून आले आणि गावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य झाले, विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ,नाना ग्रामपंचायत सदस्य झाल्या नंतर नानांचे लग्न झाले. नानांची सौभाग्यवती आदरणीय शालनताई  बोबडे यांची व नानांची एक आगळी-वेगळी जोडी समाजाला दिशादर्शक ठरली. हिंगणगाडा ह्या गावक-यांचे नानावर प्रचंड प्रेम होते पंचक्रोशीतील लोकांचेही नानांवर प्रचंड प्रेम आणि म्हणूनच सलग २५ वर्ष हिंगणगाडा गावकऱ्यांनी माय भगिनींनी सर्वांनी नानांना सरपंच पद दिले सलग पंचवीस वर्षे नाना त्या गावच्या सरपंच पदावर राहिले. या पंचवीस वर्षांमध्ये नानांनी गावाचा सर्वांगीण असा विकास केला .शासनाच्या अनेक योजना त्यांनी गावांमध्ये आणल्या. त्याच प्रमाणे सर्वसामान्य पासून सर्वांनाच त्यांच्या न्याय हाक्क व मूलभूत गरजांची जाणीव करून दिली. "जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपले | तोच साधू ओळखावा | देव तेथेची जाणावा ||"   नानांनी अनेक गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय दिला त्यांचे दुःख दूर केले .त्यांना वेळोवेळी मदत केली. शासनाच्या योजनेच्या अनुषंगाने त्यांची घरदार उभी केली. प्रसंगी त्यांना आर्थिक मदतही केली. त्यांच्या व्यवसाया मध्ये काम करत असलेल्या अनेक मजुरांचे त्यांनी विवाह सुध्दा लावून दिले. त्यांची घरे बसवली.कुटुंबाच्या घड्या बसविल्या .नानांनी समाजकारण व राजकारण करत असताना आपले सर्व भाऊ व आपले कुटुंब याची ही जबाबदारी अतिशय हुशारीने पार पाडली. नानांनी काळाची पावले ओळखून आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी व्यवसाय सुरू केले.  प्रथमता त्यांनी बेकरीचा व्यवसाय चालू केला. बेकरीच्या व्यावसाया मध्ये नानांना चांगल्या प्रकारे समाधान मिळाले. आणि म्हणूनच नानांनी आपल्या कुटुंबासाठी पुन्हा दुसरा व्यवसाय उभा केला. तो म्हणजे किराणा दुकानाचा नानांची दूरदृष्टी अतिशय प्रभावी अशी होते. त्यामुळे दोन पैसे कसे जोडता येतील याची अक्कल हुशारी त्यांच्याकडे होती. किरणा दुकानाचा व्यवसाय करत असताना त्यांनी पुन्हा वीट भट्टीचा व्यवसाय सुरू केला. आणि हा सुद्धा व्यवसाय त्यांचा खूप चांगल्या प्रकारे चालू लागला .त्याचं कारण म्हणजे त्यांची माणसं जोडण्याची पद्धत...


"जीवनाच्या ह्या प्रवासात 

संगत सोबत साधायची |

मैत्री मधल्या संवादातून 

गोड माणसं जोडायची" ||


 त्यांची मानसं जोडण्याची पद्धत... त्यांची बोलण्याची पद्धत... खूपच ममताळू प्रेमाळू कनवळू आणि भावनाळू अशी होती. त्यांच्या बोलण्या मध्ये एक प्रचंड ममत्व व मायेचा ओलावा होता. त्यामुळे नानांच्या जीवनामध्ये व्यवसाय करताना सुद्धा अनेक माणसं जोडली गेली. अनेक नौकर चाकर त्यांच्या कुटूंबातीलच एक प्रकारचे सदस्य झाली. नाना इथेच थांबले नाहीत. तर त्यांनी आपली दूरदृष्टी तसेच आपले  ज्ञानवंत गुणवंत व राजकीय संदर्भातील प्रेमाचे संबंध या बळावर रोड कॉन्ट्रॅक्टरची ही काम घेण्यास ही सुरुवात केली. ह्या कामांमध्ये सुद्धा त्यांचा चांगलाच जम बसला. त्याच बरोबर काळाची पावलं ओळखून नानांनी शेती विकत घेवून शेती व्यवसाय सुद्धा सुरू केला.

एक प्रगतशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीत नानांचा नाव झाले.

संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसाने संघर्ष हा केलाच पाहिजे. संघर्ष करताना कुठलीही लाज बाळगू नये. जीवन जगत असतांनी न थांबता सततच पुढे पुढे पाऊल टाकीत माणसांनी गेलं पाहिजे... अशा  प्रकारचा एक संदेश नानांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून आपल्या विविध व्यवसायांच्या माध्यमातून समाजातील नवयुवकां साठी  दिलेला आहे. ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.असे वाटते.

प्रगतशील पुरुषांच्या मागे एक स्त्री असते. हे आज पर्यंतच्या अनेक उदाहरणा वरुन सिद्ध झालेले आहे. आगदी त्याच पद्धतीने नानांच्या जीवना मध्ये सुद्धा नानांची सौभाग्यवती आदरणीय शालनीताई  बोबडे ह्या त्यांच्या सुविध्य पत्नी होय. व्यवसायाच्या अनुषंगाने नानांना वेळोवेळी त्यांनी पाठबळ दिले. त्यांच्या विचारांना दिशा दाखवली. नानांच्या भावनेचा कोंडमारा त्यांनी कधीच होऊ दिला नाही. हीच खरी नानांच्या संघर्षमय जीवनातील यशाची बाजू आहे .

नानांना दोन मुले नागेशदादा व रवीदादा तसेच एक मुलगी सौ.पल्लवी समीर चौगुले 

अशी तीन अपत्ये आहेत. आदरणीय नानांच्या पावलावर पाऊल ठेवूनच नागेश दादा व रवी दादा यांनी सुद्धा समाजा मध्ये आपली एक वेगळीच स्थाने निर्माण केली आहेत. शिष्टाचारांचे तसेच सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या व मानवता संवर्धन आणि निसर्ग संवर्धन याचे बाळकडू त्यांना ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले आपले वडील नाना कडून व आपल्या आई कडून मिळालेले आहे. त्यामुळेच आज पंचक्रोशीतील समाजामध्ये या दोघाही भावांचा नावलौकिक आहे.

ह्या दोघाही बंधूंनी आपल्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या वडिलांचा  वयाच्या ८० व्या वर्षी सन २०२१ ला अभिष्टचिंतन सोहळा खुप मोठ्या थाटामाटात,उत्सवात व विविध समाज व निसर्ग संवर्धनीय उपक्रमे घेवून केला आहे.

आदरणीय नानांना पाच नातू व एक नात आहे नानांचे नातू उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये एक नातू एमबीबीएस डॉक्टर चे शिक्षण घेत आहे.


जीवन ही एक बासरी आहे 

जवळ घेता आली पाहिजे |

आपले ओट आपले श्वास 

सूर लावता आला पाहिजे ||


आदरणीय नानांच्या जीवनातील यशस्वी वाटचालीची व दैपिप्यमान कार्याची दखल घेऊन समाजाने त्यांना गौरवले आहे संभाजी ब्रिगेड दौंड या शाखेने नानांना "यशस्वी उद्योजक" हा बहुमोल पुरस्कार देऊन नानांचा सन्मान केलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास फाउंडेशन पाटस या फाउंडेशनने सुद्धा नानांना "पाटस भूषण" हा खूप मोठा पुरस्कार देऊन नानांचा आपल्या पाटस गावच्या वतीने खूप मोठा असा गौरव केलेला दिसून येत आहे.

आपल्या वागण्यातून आपल्या व्यवसायातून आपल्या दूरदृष्टीतून आपल्या शिष्टाचाराने माखलेल्या प्रत्येक शब्दातून आपल्या सुसंवादातून समाजाला मानवता संवर्धनीय व निसर्ग संवर्धनीय असा बहुमोल संदेश देणारा... आपल्या प्रत्येक शब्दातून मायेने ओथांबलेले प्रेम पेरणारा... हा मानवतावादी मायाळू, कनवाळू ,भावनाळू, आनंदाळू व प्रेमाळू असा आधार वटवृक्ष वयाच्या ८४ व्या वर्षी अनामीक अकस्मीत पणे आपणा सर्वांना सोडून त्रिमितीय पोकळीतील अनंत कोटी ब्रम्हांडाच्या प्रवासाला परमपिता परमात्मा ईश्वराच्या सानिध्यात रहाण्यासाठी कायमचाच सर्वांना सोडून निघुन गेला आहे. नानांच्या जाण्याने पंचक्रोशीतील समाजाची मोठी हानी झालेली असून.... कुटुंबावर खूप मोठे दुःखाचे सावट पसरलेले आहे.

नानांच्या कुटुंबियांचे स्तवन करण्यासाठी राजकीय सामाजिक साहित्यिक उद्योजक व तळागाळातील अनेक माणसं येत आहेत. 

नाना नावाच्या या अवलिया व्यक्तिमत्त्वासाठी मी असं म्हणेल की, 

नाना, 


"तुम्ही दिवे पांघरूणी आला

ह्या अंधार भरल्या राती 

खडकाला फोडूणी पाझर 

तुम्ही त्यात लावल्या ज्योती

वंदितो तुम्हाला आमचा 

हा भक्तीने भारला भाव

ह्या समाज पंढरी मधले

तुम्ही हृदया मधले देव

No comments