शिरोळ प्रतिनिधी, सुभाष गुरव *श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान* श्री दत्त शेतकरी सहकारी सा...
शिरोळ प्रतिनिधी, सुभाष गुरव
*श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान*
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते. सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांचेकडून धारण केलेली आहे. याच पॉलिसी अंतर्गत आज दत्तात्रय लक्ष्मण डांगे, शंकर सखाराम बंडगर( उदगाव ) मधुकर मारुती कोंडे, सुदर्शन महावीर चुडप्पा (कोथळी ) दिगंबर वसंत घोरपडे (इचलकरंजी ) या पाच सभासद वारसांना पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला.
आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे 98 सभासदांच्या वारसांना 98 लाख रुपये व हात पाय रिकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे असे एकूण 101 सभासदांना 99 लाख 50 हजार रुपयाची मदत पॉलिसीमार्फत करण्यात आली आहे.
मयत सभासदांच्या वारसांना मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते चेक प्रदान करण्यात आले यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, परवेज मिस्त्री उपस्थित होते.
No comments