श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय जवखेडे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी-प्राचार्य संपत वांढेकर अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब क...
श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय जवखेडे येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी-प्राचार्य संपत वांढेकर
अहिल्यानगर प्रतिनिधी-बाळासाहेब कोठुळे-
जवखेडे खालसा येथील श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रम,भाषणे,चित्रकला स्पर्धा अशा विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करून सावित्रीच्या लेकीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले . स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका,थोर समाजसेविका, ज्ञानज्योती,विद्येची देवता , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दीन म्हणून 3 जानेवारी 2025 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील मुख्याध्यापक श्री वांढेकर एस . जे. ,पर्यवेक्षकश्री गिरि सर,सर्व शिक्षक ,शिक्षिका वशिक्षकेत्तर कर्मचारी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शिक्षिका श्रीमती सुनिता वर्पे मॅडम होत्या. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी नाटिका ,तसेच फुले यांच्या कार्यावर आधारित गीत व नाट्य सादर करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले या वेळी अनेक मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा वेष धारण केला होता.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे चित्र रेखाटले होते त्या सर्वांना बक्षिस देण्यात आले .विद्यार्थी व शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी सर्व शिक्षक श्री ससाणे सर,राठोड सर,गाडेकर सर,कांबळे सर, मतकर सर, , रावस सर,आठरे सर,शेख सर,उंदरे सर, शिंदे सर व ,गोरे भाऊसाहेब, नेहुल भाऊसाहेब,गवळीमामा,कराळे मामा,भोसले मामाआणि सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्या मदतीने कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री..संतोष शेंदुरकर यांनी केले तर आभार श्रीम. शिरसाठ मॅडम यांनी मानले.
No comments