Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

कपिलेश्वर गावचे सुपुत्र कॅप्टन औदुंबर शा. भोई यांना 'कॅप्टन ऑफ द इयर' पुरस्कार

  कपिलेश्वर गावचे सुपुत्र कॅप्टन औदुंबर शा. भोई यांना 'कॅप्टन ऑफ द इयर' पुरस्कार कपिलेश्वर गावाचे सुपुत्र आणि मर्चंट नेव्ही दलातील अ...

 कपिलेश्वर गावचे सुपुत्र कॅप्टन औदुंबर शा. भोई यांना 'कॅप्टन ऑफ द इयर' पुरस्कार



कपिलेश्वर गावाचे सुपुत्र आणि मर्चंट नेव्ही दलातील अत्यंत गुणी अधिकारी कॅप्टन औदुंबर शा. भोई यांना मर्चंट नेव्ही दलातील सर्वोच्च सन्मान ‘कॅप्टन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाने कपिलेश्वर गावाचे नाव उज्वल केले आहे.

आज या गौरवपूर्ण क्षणी आजी-माजी सैनिक वेल्फेअर संघटना, मौजे कपिलेश्वर यांच्या वतीने कॅप्टन औदुंबर भोई यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या अथक परिश्रम, नेतृत्वगुण आणि समर्पणाने हा सन्मान संपादन केला आहे.संघटनेने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, भविष्यातही अशीच प्रेरणादायी कामगिरी करण्यासाठी शुभाशय व्यक्त केले. त्यांच्या यशस्वी कार्याने प्रेरणा घेण्याचे आवाहन तरुण पिढीला करण्यात आले आहे."कॅप्टन औदुंबर शा. भोई यांचा हा सन्मान फक्त त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा विषय आहे," असे संघटनेच्या सदस्यांनी नमूद केले.कॅप्टन औदुंबर भोई यांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!

No comments