Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित राहा!महामार्ग पोलिस व हायवे मृत्युंजय दुतांची जनजागृती

  वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित राहा!महामार्ग पोलिस व हायवे मृत्युंजय दुतांची जनजागृती  पत्रकार- सुभाष भोसले उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत के...

 वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित राहा!महामार्ग पोलिस व हायवे मृत्युंजय दुतांची जनजागृती 



पत्रकार- सुभाष भोसले



उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्र व महामार्ग मृत्युंजय दुत, गोकुळ शिरगाव, कागल कंपनी व्यवस्थापन, युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ व कागल एम आय डी सी, कोल्हापूर येथील कंपनी कामगार, ऊस तोडणी कामगार, हॉटेल कामगार, असंघटित कामगार यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना निमित्याने वाहतूक नियमन व घ्यावयाची काळजी याविषयी जनजागृती करण्यात आली.

महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, महामार्ग मृत्युंजय दुत मोहन सातपुते, महामार्ग मृत्युंजय दुत जयकुमार मोरे, एम एम शेख , सागर महाराज अन्य महामार्ग मृत्युंजय दुत, यांच्या मार्फत विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली.

दुचाकी वाहन चालवताना सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या,डबल लेन रस्त्यांवर  नेहमी डाव्या बाजूने वाहने चालवावीत, झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग करा आणि  पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी प्राधान्य द्या, मद्यपान करून दुचाकी  चालवू नका, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे किंवा मेसेज  करणे टाळा.साइड इंडिकेटर आणि  वाहतूक चिन्हांचा योग्य वापर करा. लहान मुलांना वाहने चालविण्यास देऊ नका,समोरच्या वाहनाशी योग्य  अंतर ठेवा. नेहमी हेल्मेट घाला आणि सहप्रवाशासाठीही हेल्मेट ठेवा. महामार्गावर अपघात समयी जखमींना तातडीने उपचार साठी  मदत करावी.१०८;११२ हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधून अपघाताची माहिती द्यावी. पोलिसांना सहकार्य करावे.

अपघाताचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल करण्या अगोदर जखमींना मदत करावं. अशी माहिती दिली.

यावेळी युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव यांच्या वतीने पोस्टर प्रदर्शन, माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले

No comments