स्वयंसेवकांनी लोकाभिमुख कार्य करावे- डॉ. टी. एम. चौगुले ग्रामपंचायत चोकाक, तालुका हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे श्री. आ. दे. शि.प्र. म...
स्वयंसेवकांनी लोकाभिमुख कार्य करावे- डॉ. टी. एम. चौगुले
ग्रामपंचायत चोकाक, तालुका हातकणंगले, जिल्हा- कोल्हापूर येथे श्री. आ. दे. शि.प्र. मंडळ, कोल्हापूर संचलित महावीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कनिष्ठ, वरिष्ठ आणि बी.ए. बी.एड विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन डॉ. टी. एम. चौगुले, संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. समाज सुधारकांचा वारसा तरुण युवकांनी पुढे चालवावा. युवक युवतींनी समाजाशी जोडून घ्यावे. समाजसेवेचा ध्यास घेऊन लोकाभिमुख काम करावे. समाजसेवेसाठी वाहून घेतलेली तरुणांची योजना म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना होय. समाज सेवेतून समाजाची ओळख, लोकशाही मूल्यांची रुजवणूक, नेतृत्व विकास कौशल्य विकसित करून घ्यावे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अविनाश बनगे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तालुका हातकणंगले हे होते. स्वयंसेवकांनी शिबिरातून श्रम, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवन संस्कार आत्मसात करावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास प्र. प्राचार्य डॉ. उषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच मा. श्री. सुनील चोकाककर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अंकुश बनसोडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रदीप गायकवाड यांनी करून दिली. संयोजन प्रा. रविदास पाडवी यांनी केले. आभार श्री. सचिन बराटे यांनी मानले. सूत्रसंचालन सानिका सावंत आणि राजलक्ष्मी शिंदे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शिवाजी विद्यापीठ आधिसभा सदस्य श्रीमती श्वेता परुळेकर, श्री. आदिनाथ चौगुले, श्री. अंकित पोरवाल, उपसरपंच श्रीमती. सविता दत्तात्रय हालसवडे, ग्रामपंचायत सदस्य, हर्षद कांबळे,चोकाकचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्री . मनोहर पाटील,महिला बचत गटाचे सदस्य, तरुण मंडळाचे अध्यक्ष, सर्व स्वयंसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments