नेर्ले येथील दोन सुपुत्रांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर श्री.सखाराम बाळू भण...
नेर्ले येथील दोन सुपुत्रांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर तर्फे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर
श्री.सखाराम बाळू भणगे
श्री.सुभाष विष्णू जामदार
कोल्हापूर प्रतिनिधी -नारायण लोहार
द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये नेर्ले तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील श्री. सुभाष विष्णू जामदार व श्री. सखाराम बाळू भणगे यांची निवड झाली आहे. श्री. सुभाष विष्णू जामदार यांना सहकार व राजकीय कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सखाराम बाळू बनगे यांना जिल्हास्तरीय आदर्श कार्यगौरव समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सुभाष जामदार हे गोकुळ दूध संघ कोल्हापूर शाखा बिद्री सिलिंग सेंटर मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कै. आनंदराव पाटील भेडसगावकर माजी संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर यांचे ते भाचे आहेत.कै. आनंदराव पाटील भेडसगावकर यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले व्यक्तिमत्व म्हणून सुभाष जामदार यांना ओळखले जाते. सुभाष जामदार हे नेर्ले गावचे माजी डेपोटी सरपंच होते तसेच सध्या ते शेतकरी संघ जिल्हा कोल्हापूर याचे ते विद्यमान संचालक आहेत . माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या फंडातून त्यांनी सांस्कृतिक हॉल व आमदार फंडातून साताळी देवी मंदिराशेजारी भक्तांच्या निवाऱ्यासाठी प्रशस्त हॉल बांधला आहे. आता आमदार विनय कोरे यांच्या सहकार्याने नेर्ले येथे ग्राम सचिवालय बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदय आनंद दूध डेअरीचे ते चेअरमन आहेत. गोकुळ दूध संघात आपल्या प्रयत्नाने अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी लावली आहे. अशा सेवाभावी कार्यामुळे त्यांना जिल्हास्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार बहाल केला आहे..
तसेच नेर्ले गावचे सामाजिक कार्यकर्ते सखाराम बाळू भनगे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर यांच्यावतीने जाहीर झाला आहे. सखाराम भणगे यांना 1913-14 या सालात महाराष्ट्र सरकारने गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. झाडे लावा झाडे जगवा यासारखे पर्यावरण पूरक कार्यक्रमही त्यांनी राबवलेले आहेत. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी शाळेमध्ये उपस्थित राहून तेथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे. अनेक सहकारी क्षेत्रात ते उत्साहाने सहभाग घेतात. मुंबईतील गिरणी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी युनियनच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी यश मिळवले आहे. गिरणी कामगारांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी शासन दरबारी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या ते राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई या संघटनेवर सचिव म्हणून कार्यरत आहेत.
नेर्ले येथील ज्योतिर्लिंग मंदिराच्या जिर्णोद्धारामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्योतिर्लिंग मंदिराच्या बांधकामासाठी पायाभरणीपासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत ते मुंबई सोडून आपल्या नेर्ले गावात ठाण मांडून होते. अतिशय प्रामाणिक व दिलदार व्यक्तिमत्त्व म्हणून ते नेर्ले गावात प्रसिद्ध आहेत. अशा या सामाजिक कार्यकर्त्याला मानाचा जिल्हास्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
नेर्ले सारख्या ग्रामीण भागातील सुभाष जामदार व सखाराम भणगे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याने शाहूवाडी तालुक्यातील व नेर्ले गावातील ग्रामस्थ व मित्रमंडळी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
No comments