Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

चला उठा उठा ..... सरकार स्थापन करण्याची वेळ आली.....!!!!

  चला उठा उठा ..... सरकार स्थापन करण्याची वेळ आली.....!!!! आज महाराष्ट्र सरकार स्थापन करायची वेळ आली तरीही अजून जनता आणि पत्रकार मात्र मंत्र...

 चला उठा उठा ..... सरकार स्थापन करण्याची वेळ आली.....!!!!




आज महाराष्ट्र सरकार स्थापन करायची वेळ आली तरीही अजून जनता आणि पत्रकार मात्र मंत्रिमंडळात कोण कोण असणार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही, कोणत्या पक्षाच्या वाटेला कोणती मंत्रिपदे येणार यावर तर्कवितर्क लावत बसत आहेत....


सत्तेच्या लालसेने पिछाडलेले हे राजकारणी नेहमीच जनतेला गृहीत धरत आले आहेत. आजही ते जनतेला गृहितच धरत आहेत, म्हणूनच स्वत:च्या राजकीय स्वार्थी हेतूसाठी निवडणुकांचे निकाल लागूनही सरकार आजपर्यंत स्थापन झालेले नाही. 


जनतेने दिलेला कौल हा सर्वमान्य असतो पण त्यात काहीही फेरफार करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतलेली नसेल तर.... आज निकाल लागल्यापासून ते आतापर्यंत सर्वसामान्य जनतेत कुठेही जल्लोष किंवा आनंदपणे व भयमुक्त वातावरणात चर्चा होताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, जनतेला हे महायुतीचे सरकार मान्य नाही. पण शेवटी निवडणूक आहे, हार-जीत ही होतच असते पण ती निरपेक्ष भावनेने निवडणूक खेळली गेली असेल, तर त्यात वेगळा अनुभव आणि ऊर्जा असते. जी सर्वसामान्य जनतेकडून पण प्रतीत होते.


आज सरकार स्थापन होताना निदान पुढील पाच वर्षे किमान महाराष्ट्राची राजकीय,सांस्कृतिक, उद्योगधंदे यात वाढ होऊन सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार,लाडक्या बहिणीला, लाडका शेतकरी यांना पीक हमीभाव,वीज सातत्य,पाणी पुरवठा आणि निदान यांच्यांच सरकारने सुरू केलेल्या योजना सुरू राहतील अशी अपेक्षा करूया. 


महागाई नियंत्रणात राहून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे. येणारा आगामी काळच सांगेल की, जनता ह्या सरकारला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल की नाही. 


महाराष्ट्र भाषा आणि संस्कृती यावर कोणीही गदा आणण्याचे काम केले तर मनसे आहेच आपल्या पद्धतीने जाब विचारायला...तसा एक ट्रेलर आमच्या मनसैनिक यांनी मारवाड्याला दाखवला आहेच. पण ही वेळ आमच्यावर न येता त्यासाठी या सरकारने कठोर पाऊले उचलली पाहिजेत. कारण मुंबई ही महाराष्ट्राला भिक मागून नाही तर अनेक हुतात्म्यांनी आपले प्राण देऊन मिळवली आहे. त्यामुळे या मुंबईकडे आणि पर्यायाने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाची झाली नाही पाहिजे या दृष्टीने सरकारने काम करणे अपेक्षित आहे. सरकार जर आपली भूमिका पार पाडण्यास अयशस्वी ठरली तर मनसे ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणारच याबाबत मराठी माणसांच्या मनात संदेह नाही. 


माननीय राजसाहेब ठाकरे यांचे युतीतील भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असेल तरी त्यांनी ही गोष्ट मात्र विसरू नये की, राजसाहेब हे कडवट हिंदू आणि मराठी प्रेमी आहेत, त्यामुळे मराठी माणूस आणि त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणाऱ्याला मनसे सोडणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी.


देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन होत आहे, त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.....!!! 

मराठी माणसाचे हित जपत महाराष्ट्राचे चांगभले करण्याची हिंमत आपल्या सरकारला मिळो ,हीच ईश्वरचरणी प्रार्थना....!!!!


आपला


निलेश भोसले

No comments