Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}
latest

जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारासाठी सौ गीता कुंभार यांची निवड

 * जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारासाठी  सौ  गीता कुंभार यांची निवड *                        प्रतिनिधी (गडहिंग्लज विभाग डॉ ...

 *जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारासाठी  सौ  गीता कुंभार यांची निवड*                       



प्रतिनिधी (गडहिंग्लज विभाग डॉ एस जी पोवार )  आजरा  तालुक्यातील  भादवण येथील प्रथम महिला पोलीस पाटील सौ. गीता हरिबा कुंभार   यांची जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील सेवारत्न  पुरस्कारसाठी  निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे  वितरण होईल अशी  माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे  कोल्हापूर संपर्क प्रमुख डॉ. एस. जी. पोवार यांनी दिली. सौ. गीता  हरिबा कुंभार  यांना          जिल्हास्तरीय  आदर्श पोलीस पाटील सेवारत्न  पुरस्कारासाठी  निवड झालेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहें.        द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा  आयोजित विशेष शानदार पुरस्कार  वितरण सोहळयात विविध  क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीचा संस्थाचा पुरस्कार देऊन  दिगग्ज मान्यवरांच्या  शुभहस्ते  गौरव  करण्यात येणार  आहे. यामध्ये कायदा सुव्यवस्था  राखण्याबरोबरच  गावातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या  जबाबदारी उत्तम प्रकारे साभाळणे, जातीय सलोखा, सण उत्सव, गावातील तंटे  गावातच मिटवणे सह आदी प्रभावी कामे पार पडल्यामुळे सौ. गीता हरिबा कुंभार यांची जिल्हास्तरीय  आदर्श पोलीस पाटील सेवारत्न पुरस्कारसाठी  निवड झाल्यामुळे  त्याचे सर्व स्तरातून, मान्यवर, मित्रपरिवार व नाते वाईकांकडून  स्वागत व अभिनंदन होत आहे..

No comments