पुणे चिंचवड येथील श्री.गजानन अशोक पाटील यांची जिल्हास्तरीय आदर्श आरोग्यसेवक सेवारत्न पुरस्कारसाठी निवड * पुणे चिंचवड येथील श्री.गजानन ...
पुणे चिंचवड येथील श्री.गजानन अशोक पाटील यांची जिल्हास्तरीय आदर्श आरोग्यसेवक सेवारत्न पुरस्कारसाठी निवड
*पुणे चिंचवड येथील श्री.गजानन अशोक पाटील यांची जिल्हास्तरीय आदर्श आरोग्यसेवक सेवारत्न पुरस्कारसाठी निवड* पुणे जिल्हातील चिंचवड शहर येथील कुशल संघटक गजानन अशोक पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श आरोग्यसेवक सेवारत्न पुरस्कारसाठी यांची निवड झाली आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्काराचे वितरण होईल अशी माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कोल्हापूर संपर्क प्रमुख डॉ. एस. जी. पोवार यांनी दिली. श्री. गजानन पाटील यांना जिल्हास्तरीय आदर्श आरोग्य सेवक सेवारत्न पुरस्कारासाठी निवड झालेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहें. द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळयात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तीचा संस्थाचा पुरस्कार देऊन दिगग्ज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. त्यानी समाजसेवा करत
टाटा मोटर्स पुणे. येथे नोकरीं करत विविध संघटनेचे सदस्य होऊन समाज उपयोगी उपक्रम प्रभावी पणे राबवली आहेत.
सदस्य :- आरोग्य मित्र संघटना पिंपरी चिंचवड,पुणे.
सदस्य :- पोलिस मित्र संघटना पिंपरी चिंचवड,पुणे.
सदस्य :- पुणे व्हेंचेरर्स माऊंटेनिअरींग क्लब,पिंपरी चिंचवड,पुणे.
सामाजिक उपक्रम
खटाव,गावातील अंगणवाडी मध्ये स्व:खर्चाने फरशी बसवून देण्याचे भाग्य लाभले.
झाडे लावा झाडे जगवा या संदेशा नुसार वृक्षारोपण घोरडेश्वर,चौराई परिसर,सिंहगड, कोराईगढ असे खुप ठिकाणी पावळ्यात झाडे लावुन उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून झाडे जगवण्याच काम सुरु आहे.
सिंहगडावर बेसिक ॲडव्हेंचर कोर्स मधिल सहभाग तसेच या वर्षी ऑक्टोंबर मध्ये वांरक्षकांचे ट्रेनिंग झाले.
रक्तदान मात्र गरजू लोकांना लाभ होईल अशा वेळी करतो.अगदी कोरोणा काळात सुद्धा मे महिन्यात बुधरानी हॉस्पिटल मध्ये जावून थ्यालेसिमियाच्या पेशंट साठी रक्तदान केले.
०८ ऑगस्ट २०१९ च्या महापुरात बोट दुर्घटने वेळी नऊ जणांना सुरक्षित पने वाचवले.तोपर्यंत गावातील व शेजारच्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे एकूण एकोणीस जणांना सुरक्षित पने पुरातून बाहेर काढण्यात यश आले.
पूरग्रस्त भागातील ज्यांची घरे पाडली त्यांना घर बांधण्यासाठी पुण्यातील मित्रांच्या सहकार्याने आर्थिक मदत केली.
आरोग्य मित्र म्हणून काम करत असताना अपघातग्रस्त लोकांना सहकार्य करण्याचे भाग्य लाभले आहे. त्याना केलेल्या कामाची माहिती घेऊन त्याना द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय आरोग्य सेवक सेवारत्न पुरस्कारसाठी निवड झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून, मान्यवर, मित्रपरिवार व नाते वाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे..
No comments